परिवहनच्या बसेसमधून आता ५० टक्के तिकीटात जेष्ठांचा होणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:57 PM2017-11-11T15:57:43+5:302017-11-11T16:01:42+5:30

राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्रमाअंतर्गत ज्या पध्दतीने जेष्ठ नागरीकांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. तशीच सवलत आता ठाणे परिवहन सेवेमार्फतही दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजुर झाला आहे.

From the buses to transport, now 50% of the seats will be passed on to the senior citizens | परिवहनच्या बसेसमधून आता ५० टक्के तिकीटात जेष्ठांचा होणार प्रवास

- ठाणे परिवहन सेवा

Next
ठळक मुद्देशहरात ५२७५ जेष्ठ नागरीकपरिवहनवर पडणार वार्षीक पाच कोटी १० लाखांचा बोजाएचआयव्ही बाधीत रुग्णांना प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत

ठाणे - ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षात चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टिएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या परिवहनच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. या प्रस्तावानुसार जेष्ठ नागरीकांना घर बसल्या, आॅनलाईनवर अर्ज उपलब्ध होणार असून तो अर्ज भरुन परिवहनच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानुसार त्यांना ओळखपत्र मिळणार असून प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २२ लाखांच्या घरात आहे. परंतु त्या सर्वांना सेवा देण्यासाठी परिवहनची सेवा अपुरी पडत आहे. असे असले तरी मागील काही वर्षात परिवहनमध्ये नव्या बसेस दाखल होत असल्याचे ठाणेकरांना काही प्रमाणात का होईना समाधान मिळत आहे. आता परिवहनच्या सक्षमीकरणाबरोबरच ठाण्यातील जेष्ठ नागरीकांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्र म आणि नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्र मामध्ये ६५ वर्षावरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. त्याच धर्तीवर ठाणे परिवहन उपक्र मामध्ये ही सवलत देऊ केली जाणार आहे. शहरात ५२७५ इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या ग्राह््य धरून परिवहन उपक्र माने वर्षाकाठी पाच कोटी १० लाख ३२ हजार ११० रु पये इतका तोटा अपेक्षित धरला आहे. ही तुट महापालिकेकडून अनुदान स्वरु पात परिवहन उपक्र माला दिली जाणार आहे. त्यामुळे या खर्चाचा बोजा महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजुर करतांना जेष्ठांकडे आधारकार्ड देखील असावे अशी मागणी सदस्य प्रकाश पायरे यांनी केली. तर जेष्ठ नागरीकांना आॅनलाईन अर्ज उपलब्ध होणार असले तरी देखील ते भरण्यासाठी स्टेशन अथवा वागळे डेपोला जावे लागणार आहे. परंतु परिवहनने त्यांच्यासाठी टिएमटीचे टर्मिनस, चौक्या आदी ठिकाणी फॉर्म सबमीट करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, जेणे करुन शहरातील जेष्ठांना घराजवळच ही सुविधा उपलब्ध होईल. त्यानुसार या मागणीचा विचार व्हावा असे मत सदस्य राजेंद्र महाडीक यांनी व्यक्त केले.
दरम्यान, जेष्ठांना जास्तीच जास्त त्रास कसा कमी होईल यासाठी परिवहनकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. त्यामुळेच त्यांना आॅनलाईन फॉर्म उपलब्ध करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाय एचआयव्ही बाधीत रु ग्णांना देखील सवलत दिली जाणार आहे. अशा रु ग्णांना बस भाड्यात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीलसाठी संबंधित रु ग्णांना तपासणी केंद्राने दिलेली पुस्तीका दाखवावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रात ४८५० एचआयव्ही बाधीत रु ग्णांची संख्या असून त्यांना दिल्या जाणाºया सवलतीमुळे परिवहनवर वर्षाकाठी ३० लाख ८४ हजार ६०० रु पये इतका बोजा पडणार आहे.



 

Web Title: From the buses to transport, now 50% of the seats will be passed on to the senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.