संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 11:34 AM2018-02-04T11:34:02+5:302018-02-04T12:21:33+5:30

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

A budget that does not paranoid but confused - Chandrasekhar Tilak | संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

Next

 डोंबिवली - टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सलग ३१ वर्षे अर्थसंकल्पिय विश्लेषण सादर करणारे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. 

केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वेगवेगळ्या आणि नवनवीन कलांचा तसेच प्रत्येक क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा पुर्णपणाने संतुलन साधणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य चाकारमान्यांना फारसं काही देणारा अर्थसंकल्प नसला तरी देखील कृषीप्रधान देश अशी ओळख असणाऱ्या देशाच्या शेतकरी वर्गापासून ते शेतमालाच्या योग्य आणि प्रभावीपणे वितरण आणि विक्री करण्यासाठी समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यासाठी खुप काही देणारा अर्थसंकल्प आहे. तसेच पारंपारिक  शेतीपासून क्लस्टर शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सहकार्य करणारा अर्थसंकल्प आहे. 
शेती सारख्या मूलभूत उपजिवीकेच्या उद्योगापासून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी कसा फायदा होऊ शकतो हे देखील त्यांनी विषद केले. तसेच हा अर्थसंकल्प तरूण पिढीची मानसिकता, गरजा आणि वृत्ती विचारात घेऊन मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचे अर्थकारण हे IPL auction सारखे झाले आहे . त्यात अर्थसंकल्पाला राहुल द्रविड किंवा अजिंक्य राहणेची भूमिका बजावावी लागते असेही टिळक म्हणालेअयुष्यमानभव या योजनेमुळे अरोग्य क्षेत्रात होणारे बदल , त्याचा शिक्षण , अर्थकारण , राजकारण , गुंतवणूक या क्षेत्रांवर होणारा पारीणाम याचे केलेले सविस्तर व खुमासदार वर्णन हा तर या भाषणाचा कळस होता .

करबाबत तरतूदींबद्दल बोलताना दिर्घ कालीन भांडवली नफ्यावर लागू झालेला कर हा काही अंशी अपेक्षितच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्याचा शेअर बाजाराचा उच्च निर्देशांक हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल नसल्याचेही त्यांनी सांगितले. दिर्घ कालीन भांडवली नफ्यावर लागू झालेला कर आणि ज्येष्ठ नागरीकांना दिलेली बॅंक ठेवींवरील व्याजातील सूट हे सूत्र शेअर बाजारातील पैसा बॅंकांकडे वळवून बॅंकाच्या विलीनीकरणासाठीची पुर्वतयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास सगळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय हे अर्थसंकल्पाबाहेर घेतले गेल्याचे आढळते आणि त्यामुळेच या अर्थसंकल्पाकडून अपेक्षित असणारा आर्थिक वर्षाच्या कालावधीतील बदल हा येणाऱ्या काही महिन्यात जाहीर करण्यात येईल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: A budget that does not paranoid but confused - Chandrasekhar Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.