पोटनिवडणुकीत भाजपचे जग्यासी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:49 PM2019-06-10T22:49:09+5:302019-06-10T22:49:41+5:30

उल्हासनगर : पूजा बनिया, अंबादास पालवे यांची माघार, एका प्रभागात तिरंगी लढत

BJP's unmoderated by-election in the by-election | पोटनिवडणुकीत भाजपचे जग्यासी बिनविरोध

पोटनिवडणुकीत भाजपचे जग्यासी बिनविरोध

Next

उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र. १ आणि ५ मध्ये २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी प्रभाग क्र. ५ मध्ये अंबादास पालवे व पूजा बनिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे राजू जग्यासी बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र .१ मध्ये अपक्ष उमेदवार रामा शेले व एकनाथ आढारे यांनी अर्ज मागे घेतले असून वनीता भोईर, मंगळ वाघे व नितीन मेश्राम यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र. १ व ५ च्या पोटनिवडणुकीत प्रत्येकी सहा उमेदवार रिंगणात होते. अर्ज छाननीत प्रभाग क्र. ५ चे रिपाइं पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप जग्यासी, माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार पृथ्वी वलेच्छा, राहुल अंबावणे यांचे अर्ज बाद झाल्याने भाजपचे राजू जग्यासी, अपक्ष उमेदवार अंबादास पालवे व पूजा बनिया असे तीन जण निवडणूक रिंगणात राहिले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांच्या राजकीय खेळीमुळे अपक्ष उमेदवार पूजा बनिया व अंबादास पालवे यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राजू जग्यासी एकमेव रिंगणात राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

महापालिका प्रभाग क्र. १ मध्ये भाजपच्या वनीता भोईर यांच्यासह काँग्रेसचे नितीन मेश्राम, रिपाइं आठवले गटाच्या मंगळ वाघे, रामा शेले व अपक्ष उमेदवार एकनाथ आढारे असे पाच जण रिंगणात होते. त्यापैकी रामा शेले व एकनाथ आढारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या वनीता भोईर, काँगे्रसचे नितीन मेश्राम व रिपाइंच्या मंगळ वाघे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजप नगरसेविका पूजा भोईर व सोनू छापरू यांचे जातप्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरवत नगरसेवकपद रद्द केल्याने या पोटनिवडणुका होत आहे. प्रभाग क्र. १ मध्ये भाजप, शिवसेना, साई, ओमी टीमविरुद्ध रिपाइं व काँग्रेस अशी लढत होणार आहे.
 

Web Title: BJP's unmoderated by-election in the by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.