ठाण्यात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:24 PM2019-05-09T23:24:54+5:302019-05-09T23:57:56+5:30

किरकोळ कारणावरून ठाण्यात भाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

BJP-MNS activists attacked Thane due to minor reasons | ठाण्यात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीमार

ठाण्यात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीमार

Next

ठाणे -  किरकोळ कारणावरून ठाण्यात भाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. फूटपाथवर आंब्याच्या लावण्यात येणाऱ्या स्टॉल वरून वादावादी झाली. यामध्ये भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. पोलिसांनी केला लाठीचार्ज दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंगावले. 

 ठाण्यातील विष्णु नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे, त्या बाजूलाच फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता. मात्र हा स्टॉल फुटपाथवर असल्याने भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला, दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. एवढंच नव्हे तर एकमेकांनी चक्क पक्षश्रेट्टी वर जोरदार शिव्या सुरू केल्या. दरम्यान यावेळी पोलिसांनी शांत बसल्याचे आवाहन करून देखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानले नाही. 

 दरम्यान या मध्ये नौपाडा पोलिसांनी भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यावर जबर लाठीचर्ग करण्यात आला.सदर घटनेत पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगापांग केली. यावेळी भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी तसेच त्याच्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. यावेळी दोन्ही पक्षाची संस्कृती नागरिकांना दिसून आली.

Web Title: BJP-MNS activists attacked Thane due to minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.