भाजपा नेत्यावर पडघ्यात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:22 AM2018-10-22T00:22:08+5:302018-10-22T00:22:11+5:30

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजू उर्फ राजेश गायकर यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

BJP leader firing in the fall | भाजपा नेत्यावर पडघ्यात गोळीबार

भाजपा नेत्यावर पडघ्यात गोळीबार

Next

पडघा (भिवंडी) : भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजू उर्फ राजेश गायकर यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
गायकर हे पडघ्याहून आन्हे येथे कारने घरी परतत असताना एका कार आणि मोटारसायकलने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गायकर यांनी मोबाइलवरून गावातील तरुणांना ही खबर दिली. तरुण मदतीसाठी आल्याचे पाहून हल्लेखोर खडवलीच्या दिशेने पळाले. गायकर यांनी त्यांचा पाठलाग केला. हल्लेखोर वांद्रे गावाच्या दिशेने गेले होते; मात्र पुढे रस्ताच नसल्याने त्यांनी गाडी सोडून दिली. हल्लेखोराने गायकर यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. अंतर जास्त असल्याने गायकर बचावले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

Web Title: BJP leader firing in the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.