भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:27 AM2018-02-01T06:27:29+5:302018-02-01T06:28:13+5:30

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.

Bhiwandi Municipal Corruption : Opposition to Metro from Kalyan Road | भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

Next

भिवंडी - महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिकाºयांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.
राजीव गांधी ते टेमघर या मार्गाने मेट्रो रेल्वे जाऊ नये म्हणून साकडे घालण्यासाठी मंगळवारी कल्याणरोडच्या रहिवाशांनी महापौर जावेद दळवी यांची भेट घेतली. मागील महासभेत कल्याणरोड व वंजारपाटीनाका या दोन मार्गाने मेट्रो रेल्वे नेण्यास मान्यता दिली होती. या मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा विषय बुधवारच्या महासभेत आला असता शिवसेनेचे नगरसेवक मदनबुवा नाईक, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांच्यासह काही सेना व काँग्रेस नगरसेवकांनी कल्याण रोडवरून मेट्रो नेण्यास विरोध केला. त्यामुळे महासभेत कल्याणरोड मार्ग व वंजारपाटीनाका मार्ग असे दोन गट निर्माण झाले. तसेच सभागृहाबाहेर कल्याणरोड रहिवाशांनी गर्दी केली होती. अखेर सभागृहाने मागील इतिवृत्तास मान्यता दिल्यानंतर महासभेपुढे इतर विषयांची चर्चा झाली. राजीव गांधी चौक ते टेमघर या कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळे व इमारती उभ्या केल्या आहेत. तर वज्रेश्वरी संस्थान आणि इतर संस्थानच्या मालकीच्या जागा या मार्गावर आहेत. त्यामुळे मूळ जमिनीचा सातबारा अथवा सिटीसर्वे उताºयावर अनेक रहिवाशांची नावे नाहीत. त्यामुळे अशा काही ठराविक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात काही जमीनमालकांना व गाळे धारकांना पंचनामा तसेच नुकसानभरपाई न दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.

गोदामांना लागलेल्या आगीचे महासभेत पडसाद
भिवंडी : गायत्रीनगरमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचे पडसाद महासभेत उमटले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने घटनास्थळी आल्याने नागरिकांचे जास्त नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक शरद धुळे आणि अहमद सिध्दीकी यांनी केला.
अग्निशमन दलाचा बंब रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांना धक्का देऊन घटनास्थळापर्यंत गाडी न्यावी लागली. तसेच घटनास्थळी टँकरचे पाणी पाठवण्यासाठी पालिकेच्या व-हाळा पाणीशुध्दीकरण केंद्रात फोन उचलणारा कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांनी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती नगरसेवकांनी दिल्याने संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी अग्निशमन दलप्रमुख दत्ता साळवी यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना दिले.

 

 

Web Title: Bhiwandi Municipal Corruption : Opposition to Metro from Kalyan Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.