डोंबिवलीतील बँकांनी एटीएमसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख सांभाळावी - विजयसिंग पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:17 PM2018-02-07T18:17:34+5:302018-02-07T18:25:04+5:30

डोंबिवली शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे.

Banks in Dombivli should take responsibility for the security of customers including ATMs - Vijay Singh Pawa | डोंबिवलीतील बँकांनी एटीएमसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख सांभाळावी - विजयसिंग पवार

रामनगर पोलिस ठाण्यात मॅरेथॉन चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे बँक अधिका-यांसह पोलिसांची बैठक संपन्नरामनगर पोलिस ठाण्यात मॅरेथॉन चर्चा

डोंबिवली: शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत कानाडोळा करु नका, घटना घडून गेल्यावर सतर्क होण्यापेक्षा आधीच सतर्क असावे, असे आवाहन रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनी बँक अधिका-यांना केले.
शहरातील विविध बँकांच्या खात्यांमधून ग्राहकांचे पैसे आपोआप वळती झाले. अशा सुमारे ३० हून अधिक घटना घडल्या असून लाखो रुपये परस्पर वटवले गेल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली असून आता खातीही सुरक्षित नसल्याचे नीदर्शनास आल्याने पोलिसांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व राष्ट्रियीकृत बँका, खासगी बँकांचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी सर्व अधिका-यांना सांगितले की, जेवढी जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे तेवढीच बँक अधिकारी म्हणुन त्यांचीही आहे, खात्यांमधून पैसे आपोआप वळती व्हायला लागले तर मात्र गंभीर स्थिती असून वेळीच त्यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे अन्यथा मोठी आपत्ती ओढावू शकते. एकापाठोपाठ एक अशा घटना होत आहेत, पण तरीही बँका स्वस्थ कशा बसू शकतात, सुरक्षिततेविषयी कोणालाही गांभिर्य का नाही. आज ग्राहकांचा पैसा जात आहे, त्यात आपलेही कुटुंबिय असू शकतात. त्यांच्या मानसीकतेचा विचार करावा आणि योग्य ती खबरदारीची पावले तातडीने उचलावीत असेही आवाहन त्यांनी केले. पोलिस उपनिरिक्षक सुनिल खैरनार, बालाजी शिंदे आदींनी ही बैठक आयोजित केली होती.
एटीएममध्ये प्रामुख्याने लक्ष द्यावे, जेणेकरुन डेटाचोरीसारख्या घटनांना प्रतिबंध घालता येईल. एटीएममध्ये हेल्मेट घालणे, रुमाल बांधणे, डोक्यावर, डोळयावर गॉगल लावणे, यासह मास्क लावणे असे कोणीही आढळल्यास त्यास तातडीने हटकावे, उघड्या डोक्यासह चेह-याने प्रवेश द्यावा. तसेच एटीएम जवळ कोणी सातत्याने फे-या मारत असेल घुटमळत असेल, बराच वेळ थांबत असेल तर अशांनाही हटका, त्यांची विचारपूस करा, संशयित वाटल्यास तातडीने पोलिसांना सतर्क करा असेही ते म्हणाले. अलार्म योग्य नसणे ही धोक्याची घंटा असून ते योग्य नाहीच. सर्व बॅकांनी तातडीने अलार्म टेस्ट करावेत ते वाजत आहेत की नाहीत हे बघावे आणि त्याप्रमाणे पोलिसांना सूचित करावे. तसेच ज्यांच्याकडे ही यंत्रणा कार्यान्वित नाही, त्यांनी तातडीने ते बसवावे. ग्राहक हित लक्षात घेऊन पावले उचलावीत. त्यावर बँक अधिका-यांनी पोलिस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे सांगत अशा बैठका वारंवार होणे अपेक्षित असल्याचे म्हंटले. त्यानूसार तीन महिन्यातून संवाद बैठक घेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Banks in Dombivli should take responsibility for the security of customers including ATMs - Vijay Singh Pawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.