बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:46 AM2018-02-06T02:46:36+5:302018-02-06T02:46:51+5:30

वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे.

Bank ATMs Dombivali unsafe | बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली : वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. याबाबत बँकांनी काळजी घ्यावी, सुरक्षारक्षक नेमावे, अशी सूचना त्यांना दिली जाणार असून त्यासाठी मंगळवारी बँक अधिकाºयांची बैठक होणार आहे.
जानेवारीत विविध बँकांमधील ग्राहकांचे पैसे रातोरात दिल्लीतील व्यक्तीने वळते करून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर रामनगर पोलिसांनी पार हरियाणापर्यंत जाऊन त्याचा मागोवा घेतला. त्यात बँकांचे एटीएम असुरक्षित असून तेथूनच ग्राहकांचा डेटा चोरीस जात असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या हाती आला आहे.
बँकांच्या एटीएममध्ये विशिष्ट पद्धतीने लावलेल्या डिव्हाईसमध्ये ग्राहकांच्या खात्यांसह अन्य माहिती गोळा केली जाते. त्या आधारे दिल्ली, हरियाणा अशा विविध ठिकाणांहून पैसे वळते केले जात असल्याने तपासकामात अडथळे येतात. तसे पुन्हा घडू नये, सध्या होणाºया घटनांना आळा बसावा, यासाठी ठिकठिकाणच्या बँकांनी एटीएममध्ये सशक्त, सुशिक्षित सुरक्षारक्षक तैनात करावे, असे आवाहन पोलिसांनी केले असून रामनगर पोलीस ठाण्यात होणाºया बँक अधिकाºयांच्या बैठकीत तसे सुचवले जाण्याची शक्यता आहे. एटीएमच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटींवर त्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
एटीएममध्ये येणाºया व्यक्ती अनेकदा चेहरा झाकतात. रुमाल बांधतात. टोपी-मास्क-हेल्मेट घालतात. त्यामुळे सुरक्षेसाठी कॅमेरे असले तरी चेहरा दिसत नाही. तपासात अडथळा येतो. त्यामुळे अशा व्यक्तींना सुरक्षारक्षकांनी हटकायला हवे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हवे, यासारखे मुद्देही यावेळी समोर येण्याची शक्यता आहे.
>‘२५ ग्राहकांना फटका’
२० जानेवारीला डोंबिवलीतील सात व्यक्तींनी पैसे वळते झाल्याची तक्रार रामनगर आणि टिळकनर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतरच्या तपासात सुमारे २५ ग्राहकांना फटका बसल्याचे दिसून आले.
त्यामुळे बँकांची तातडीची बैैठक घेत असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Bank ATMs Dombivali unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.