नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:58 AM2018-11-08T02:58:41+5:302018-11-08T02:59:10+5:30

आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे.

An attempt to indulge in different kinds of anger, Narendra Mehta | नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न

नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न

Next

- राजू काळे

भार्इंदर - आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे. ही संस्था मेहता यांच्या स्पर्धक माजी महापौर गीता जैन यांची समर्थक मानली जात असल्याने संस्थेची स्थापना म्हणजे मेहता यांना काटशह देण्याचा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
१९८० मध्ये जनता पार्टीच्या नामकरणानंतर मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाला ज्यांनी तारले, त्यांना सध्याच्या स्थानिक नेतृत्वाने डावलण्यास सुरुवात केली आहे. पक्षात बाहेरून आलेल्यांना मानसन्मान देत त्यांच्या हाती महत्त्वाची पदे दिली जात असल्याने ज्येष्ठांच्या मनात असंतोष पसरला आहे.
निष्ठावंतांना डावलून त्यांच्याकडील पदे काढून घेत मर्जीतील पदाधिकाऱ्यांना पदावर विराजमान करण्याचा फंडा सध्या सुरू झाल्याने ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जनसंघापासून भाजपाला तारणारे गंगाधर गाडोदिया कुटुंब, भास्करराव धामणकर कुटुंब, खिटे कुटुंब, वंदना अरुण गोखले, ऊर्मिला गोखले, चितारी बंधू, गंगाधर पाटील, डॉ. शरद कुळकर्णी, हसमुख तेली यांची नावे सध्या भाजपाच्या पाट्यांवर कुठेही दिसत
नाहीत.
या ज्येष्ठ पदाधिकाºयांनंतर त्यांच्या पुढील पिढ्यांनी भाजपाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. जनसंघाचा १९७६ मध्ये शहरात प्रभाव असताना त्यावेळी भार्इंदर पश्चिम ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षाचे सहा, काँग्रेसचे सहा व तीन अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यावेळी गाडोदिया, गिल्बर्ट यांचे वडील जॉन यांनी काँग्रेसला एकाकी पाडून गिल्बर्ट यांना पहिले सरपंचपद बहाल केले.
जनसंघाचा वरचष्मा कायम राखून भाजपाच्या स्थापनेनंतर पक्षातील वरिष्ठांनी पक्षाचा प्रभाव कायम ठेवला.
२००७ मधील महापालिका निवडणुकीत राष्टÑवादीचे त्यावेळचे स्थानिक नेतृत्व गिल्बर्ट यांनी अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र मेहता यांना महापौरपदी विराजमान केले. महापौरपद हाती येताच मेहता यांनी मागे वळून न पाहता स्थानिकस्तरावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यांनी पक्षातील जुन्यांचा मानसन्मान काढून घेत तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली.
२०१२ मधील काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता उलथवून टाकून २०१५ मध्ये सेना-भाजपाची सत्ता स्थापन केली. यावेळी त्यांनी महापौरपदावर आपली वहिनी व सध्याच्या महापौर डिम्पल मेहता यांना विराजमान करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, गीता जैन यांनी आपले बंधू संजय पूनमिया यांच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठांमार्फत महापौरपदावर उडी घेतली. यामुळे मेहता यांच्या प्रयत्नाला सुरुंग लागला. यानंतर, मेहता व जैन वादाला तोंड फुटले. पुढे हा वाद गटबाजीत परावर्तित होऊन सध्या दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.
एकूण १०० ज्येष्ठांसह नाराजांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. त्याला अटल फाउंडेशन असे गोंडस नाव देऊन ही संस्था थेट जैन यांची समर्थक मानली जात आहे.

भाजपा किंवा स्थानिक नेतृत्वाने कोणत्याही ज्येष्ठांना डावललेले नाही, अशी भावना त्यांच्यात रुजवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्याच माध्यमातून स्थापन करण्यात आलेली अटल फाउंडेशन ही संस्था भाजपातीलच ज्येष्ठांची असल्याने पक्षावर त्याचा परिणाम होणार नाही. - चंद्रकांत वैती, उपमहापौर

अटल फाउंडेशनशी माझा कोणताही संबंध नाही. मात्र, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षातील ज्येष्ठांनी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या पाठीशी मी सदैव उभी राहणार असून मलाही ते वेळप्रसंगी सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.
- गीता जैन, माजी महापौर

Web Title: An attempt to indulge in different kinds of anger, Narendra Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.