विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:47 AM2018-03-07T06:47:24+5:302018-03-07T06:47:24+5:30

अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.

 Assembly preparations: Congress's scrutiny for Ambernath constituency continues | विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

Next

अंबरनाथ  - अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाने नगराळे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी मतदारसंघाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व हे पूर्वीपासून होते. मात्र वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड सर्वांची होती. त्यातच गेल्यावेळेस दिलेल्या उमेदवाराबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवार आत्ताच निश्चित करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गेल्या निवडणुकीचा अहवाल पाहता राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते ही काँग्रेसने मिळवलेली आहेत. त्यामुळे पुढील विधानसभेच्या निवडणुकीत अंबरनाथची जागा ही काँग्रेससाठीच मागायची असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण ताकद देण्यासाठी पक्षाने देखील योग्य सहकार्य करावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या आढावा बैठकीनंतर नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने मतदारसंघांची चाचपणी सुरू केल्याचे मान्य केले. पक्षाला अपेक्षित असलेली सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. अंबरनाथमधील पदाधिकाºयांशी चर्चा केल्यावर कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी तयार आहेत. ही जागा काँग्रेस लढवणार हे निश्चित असले तरी आघाडी करण्याची वेळ आली तर त्यावेळेस मागील निवडणुकीचा आकडा पाहून ही जागा काँग्रेसकडे कशी राहिल या संदर्भात अहवाल पाठवला जाणार आहे.

काम केल्यास परिवर्तन घडेल

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कॅप्टन निलेश पेंढारी, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून हे काम तळागळापर्यंत कसे पोहचवता येईल यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राला उल्हासनगर महानगरपालिकेतील २२ प्रभाग जोडण्यात आले असून त्या भागातही काँग्रेस आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांन सांगितले. या मतदारसंघात योग्य प्रकारे काम केल्यास या ठिकाणी परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title:  Assembly preparations: Congress's scrutiny for Ambernath constituency continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.