महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृतास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:16 AM2019-05-25T06:16:43+5:302019-05-25T06:16:45+5:30

ठाणे : कासारवडवली भागातील १० ते १५ महिलांचा विनयभंग करणाºया निवृत्ती गवते (२३) या विकृत तरुणाला कासारवडवली पोलिसांनी सापळा ...

Arrested for molester of women | महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृतास अटक

महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृतास अटक

Next

ठाणे : कासारवडवली भागातील १० ते १५ महिलांचा विनयभंग करणाºया निवृत्ती गवते (२३) या विकृत तरुणाला कासारवडवली पोलिसांनी सापळा लावून गुरुवारी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
२५ ते ३५ वयोगटातील तरुणी तसेच महिलांकडे पाहून निवृत्ती हा अश्लील शेरेबाजी करत त्यांचा विनयभंग करत होता. नंतर तो पसार होत होता. भीतीपोटी अनेकींनी त्याची तक्रारच केली नाही. त्यामुळेच त्याची हिंमत वाढत गेली. ६ मे रोजी सकाळी वाघबीळ ब्रिजच्या खाली प्रेस्टिजकडे जाणाºया महिलेशी त्याने अश्लील शेरेबाजी केली. तिच्यासोबत असलेल्या महिलेला मिठी मारून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी २२ मे रोजी दोघींनीही कासारवडवली पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे माहिती काढत सापळा रचून त्याला अटक केली.

Web Title: Arrested for molester of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.