वाहनतळचालकाकडून मनमानी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:13 AM2019-06-12T00:13:15+5:302019-06-12T00:13:46+5:30

मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया मार्गावर असलेल्या पालिकेच्या वाहनतळावर ठेकेदाराकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतची ...

Arbitrary recovery from the transporter | वाहनतळचालकाकडून मनमानी वसुली

वाहनतळचालकाकडून मनमानी वसुली

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया मार्गावर असलेल्या पालिकेच्या वाहनतळावर ठेकेदाराकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतची तक्रार पालिका आयुक्तांसह संबंधितांना करून ठेका रद्द करण्यासह अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी केली गेली आहे.

शहराच्या विकास आराखड्यात शिवार उद्यानालगत कनकिया मार्गावर वाहनतळाचे २६४ अ हे आरक्षण आहे. सध्याच्या स्टार बाजारमागील या वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनानंतरदेखील अनेक महिने वाहनतळ बंदच होते. अखेर, ओम साई सिद्धी या बेवर्ली पार्कच्या सॅण्डस्टोन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा पत्ता असणाऱ्या प्रमोद पांडे या ठेकेदारास १ आॅगस्ट २०१६ पासून ३१ जुलै २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी पालिकेने सदरचे पार्किंग भाड्याने दिले आहे. पहिल्या वर्षात प्रतिमाह ३६ हजार ३३३ रु., तर शेवटच्या तिसºया वर्षात ५४ हजार ४९२ रुपये प्रतिमाह पालिकेला देणे बंधनकारक आहे. सध्याचे तिसरे वर्ष चालू आहे. परंतु, सदर वाहनतळावर ठेकेदाराकडून मनमानी शुल्कवसुली केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.
खाजगी दुचाकी वाहनाच्या २४ तासांकरिता १२ रुपये, तर वाणिज्य वापराच्या दुचाकीसाठी ५० रु. शुल्क घेणे बंधनकारक असताना ठेकेदाराने कृष्णा यांच्याकडून खाजगी दुचाकीकरिता तब्बल ६० रु. उकळले. ठेकेदाराकडून दिलेल्या पावतीमध्ये ६० रु. शुल्क आकारल्याचे नमूद असून वाहनाचा पूर्ण क्रमांक व त्याचा प्रकार मात्र लिहिला जात नसल्याचेदेखील यानिमित्ताने उघड झाले.

कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याची मागणी
च्याप्रकरणी कृष्णा गुप्ता यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह महापालिका आयुक्त आदींकडे तक्रार केली आहे. ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याची अनामत रक्कम जप्त करा आणि संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

च्मीरा रोडच्या वाहनतळ ठेकेदाराकडून मनमानी वसुलीप्रकरणी त्याचा ठेका रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई पालिकेने कृष्णा यांच्या तक्रारीवरून केली होती. पालिका अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे याकडे डोळेझाक होत आहे.

Web Title: Arbitrary recovery from the transporter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.