‘त्या’ रुग्णवाहिकांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:54 AM2017-07-26T00:54:40+5:302017-07-26T00:55:28+5:30

तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत.

Ambulance didn't Work | ‘त्या’ रुग्णवाहिकांना अवकळा

‘त्या’ रुग्णवाहिकांना अवकळा

Next

कल्याण : तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांनी सांगितले.
केडीएमसीकडे चार जुन्या रुग्णवाहिका, दोन फिरते दवाखाने आणि दोन शववाहिन्या आहेत. चार रुग्णवाहिकांपैकी प्रत्येकी दोन वाहने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला दिली आहेत. यातील प्रत्येकी एक रुग्णवाहिका सध्या बंद आहे. तर या रुग्णालयांना प्रत्येकी एक फिरता दवाखाना आणि शववाहिनी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त आमदार गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून दोन कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. पण त्या वापराअभावी जागेवर उभ्या आहेत. रुग्णालयाच्या आवारात चालक आणि डॉक्टर, नर्सेसविना खितपत पडलेल्या या रुग्णवाहिकांची पाहणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई, शहरसचिव महेश मोरे, सागर जेधे, संजय राठोड आदींनी केली.
एकीकडे साथीच्या आजारांनी नागरिक बेजार झाले असताना दुसरीकडे रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडलेल्या रुग्णवाहिकांबाबत त्यांनी डॉ. रोडे यांची भेट घेत त्यांना विचारणा केली. यावर त्यांनी रुग्णवाहिका चालवण्यासाठी चालक नसल्याकडे लक्ष वेधले. कार्डियक रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाºयांचीही आवश्यकता आहे, परंतू त्यांचीही कमतरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर रुग्णवाहिका असूनही गरजू रुग्णांना त्या उपलब्ध करू शकत नाही, याबाबतची खंत पदाधिकाºयांनी या वेळी व्यक्त केली.


केवळ ‘शो’बाजी कशाला करता?
आमदार निधीतून कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या, परंतु केवळ ‘शो’बाजीनंतर त्यांची काय अवस्था आहे, याची जाणीव आमदारांना नाही. त्यातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय विभागाशी निगडीत असलेले खाते आहे. असे असतानाही रुग्णालयांना भेडसावणारे अपुरे मनुष्यबळ ही एकप्रकारे सत्ताधाºयांसाठी नामुष्की आहे, अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Ambulance didn't Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.