अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:27 AM2018-12-27T03:27:14+5:302018-12-27T03:27:28+5:30

नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे.

Ambernath, Badlapur, water supply, Barvi, and Andhra Dhana dams in the reservoir | अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

Next

बदलापूर - नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. जिल्ह्यात आठवड्यातून ३० तास पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०१८ च्या झालेल्या बैठकीत घेतला आहे.

जानेवारीच्या दुसºया आठवड्यापासून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना धरणातून होणारा पाणीपुरवठा यापुढे एक दिवसाआड होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गांभीर्याने कधी बघणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईच्या झळा आता यापुढे अधिक प्रकर्षाने जाणवणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर ही पाणीकपात लागू होणार असल्याने यापुढील काळात नागरिकांना उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतसा पाणीकपातीचा आणखीनच सामना करावा लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या अनेक भागांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने बदलापूर, अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईला नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  

टंचाईग्रस्त अंबरनाथकरांनी रोखला महामार्ग

अंबरनाथ : नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी हंडा आणि कळशा घेऊन कल्याण-बदलापूर महामार्ग बुधवारी सकाळच्या वेळेस काही काळ रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. पाणीकपात आणि अनियमित येणारे पाणीही येत नसल्याने बुवापाडा परिसरातील नागरिकांना हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

बुवापाडा येथे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी संतप्त होऊन कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरला. यामुळे काही काळ कोंडी झाली होती. जोपर्यंत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी येऊन पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतल्याने अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणीखात्याचे अधिकारी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लघुपाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येत असल्याने त्यापुढे पाण्याची पातळी वाढण्यास काही कालावधी लागतो. मात्र, बुवापाडा भागात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी लक्ष देणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.डी. शिंदे यांनी दिली.

Web Title: Ambernath, Badlapur, water supply, Barvi, and Andhra Dhana dams in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.