अंबरनाथ, बदलापूर नगराध्यक्षांची निवडणूक तीन तासात रद्द, नवा आदेश आणि नवी तारीख आज जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:10 AM2017-11-15T02:10:29+5:302017-11-15T02:10:48+5:30

अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्यावर अवघ्या तीन तासात त्यांनी आपला आदेश रद्द केला.

Ambernath, Badlapur municipal election will be canceled in three hours, new order and new date will be announced today | अंबरनाथ, बदलापूर नगराध्यक्षांची निवडणूक तीन तासात रद्द, नवा आदेश आणि नवी तारीख आज जाहीर होणार

अंबरनाथ, बदलापूर नगराध्यक्षांची निवडणूक तीन तासात रद्द, नवा आदेश आणि नवी तारीख आज जाहीर होणार

Next

बदलापूर/अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्यावर अवघ्या तीन तासात त्यांनी आपला आदेश रद्द केला. २४ नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार होती. निवडणुकीची नवीन तारीख उद्या उपविभागीय अधिकारी जाहीर करणार आहेत.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपल्याने या पदासाठी नव्याने निवडणूका घेण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षाकरिता महिलांना राखीव आहे. तर बदलापूरचे पद हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवले आहे. दोन्ही पालिकांमध्ये उमेदवारीसाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्र म पालिका कार्यालयाला प्राप्त होताच राजकीय पक्ष कामाला लागले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एकच दिवस असल्याने या प्रकरणी राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान तीन दिवस देणे गरजेचे होते असे मत पुढे आले. जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानंतर निवडणूक कार्यक्र मासंदर्भात झालेली चूक लक्षात येताच त्यांनी लागलीच या निवडणुकीचा कार्यक्र म रद्द केला. तसेच जास्त वादात न पडता या निवडणुकीच्या कार्यक्र माची जबाबदारी थेट कल्याणच्या उपविभागीय अधिकाºयांवर सोपवण्यात आली. नवीन निवडणुकीचा कार्यक्र म ठरवण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाºयांना मिळाल्याने बुधवारी नव्याने तारीख निश्चित होण्याचे संकेत आहेत.
जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या सुरूवातीच्या आदेशात १४ नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाल्यावर १५ नोव्हेंबरला दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक ही २४ नोव्हेंबरला असली तरी अर्ज भरण्यासाठी अल्प कालावधी मिळाल्याने समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेनेवर तारेवरची कसरत करण्याची वेळ आली होती. त्यामुळेच राजकीय दबाव टाकून हा निवडणुकीचा कार्यक्र म रद्द केल्याची चर्चा सुरू झाली. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असली तरी सत्ताधारी सेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते रचण्याची स्वप्न भाजपा पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या या रणनितीला शिवसेना कशा पध्दतीने उत्तर देणार हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या गोटातून उमेदवारी अर्ज दाखल होतो की नाही याची उत्सुकता लागलेली आहे. तर अंबरनाथमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळणार याकडे लक्ष आहे.

Web Title: Ambernath, Badlapur municipal election will be canceled in three hours, new order and new date will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.