अंबरनाथ : अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, 2 अल्पवयीन मुलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:12 AM2018-02-26T01:12:21+5:302018-02-26T01:12:21+5:30

येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ambernath: Attempted suicide attempt of minor boy, video vicious viral, 2 minor kids arrested | अंबरनाथ : अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, 2 अल्पवयीन मुलांना अटक

अंबरनाथ : अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, 2 अल्पवयीन मुलांना अटक

Next

अंबरनाथ : येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करतानाचा व्डिडीओही त्यांनी तयार केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा अत्याचार उघड झाला. त्या बदल्यात सतत पैशांची मागणी झाल्याने आणि अत्याचार असह्य झाल्याने पीडित विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य आणि देशात महिला, अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंबरनाथमध्येही लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एका खासगी शाळेतील नववीच्या वर्गात शिकणाºया एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थी परिसरातील पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित विद्यार्थ्याचा अत्याचार करताना या दोन्ही विद्यार्थ्यांनी व्हिडीओ तयार केला होता. या दोन्ही विद्यार्थ्यांनी पिडीत विद्यार्थ्याला धमकावत पैशांची मागणी केली. पैसै न दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घाबरलेल्या पिडीत अल्पवयीन विद्यार्थी या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून घरातून पैसे आणून देत होता.
अखेर पैशांसाठी रोज दिल्या जाणाºया धमक्या आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरलेल्या या विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
आरोपींची बालसुधारगृहात रवानगी-
हा अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरूणाच्या हाती आल्याने त्याने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.
या सर्व घटनेची पीडित मुलाच्या पालकांनाही माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्र ार दिली. या दोन्ही मुलांना अटक करून त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Web Title: Ambernath: Attempted suicide attempt of minor boy, video vicious viral, 2 minor kids arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.