ठाण्यातील पालिका शाळांच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह भोजनाची वर्षपूर्ती

By जितेंद्र कालेकर | Published: August 1, 2018 10:19 PM2018-08-01T22:19:41+5:302018-08-01T23:16:48+5:30

देशभरात नावाजलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. सकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागल्याचे शिक्षक सांगतात.

'Akshayabatra' completed year of midday meal for serving 6000 students of Thane Municipal Schools | ठाण्यातील पालिका शाळांच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह भोजनाची वर्षपूर्ती

२६ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था

Next
ठळक मुद्दे पवारनगर येथील जागेत साकारले भव्य स्वयंपाकगृह२६ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्थासकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा

जितेंद्र कालेकर
ठाणे : संपूर्ण देशभर विस्तार असलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. नियमित आणि पुरेशा मिळणाऱ्या या माध्यान्ह भोजनाच्या निमित्तानेही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागल्याचे अनेक पालक सांगतात.
विद्यार्थ्यांना भोजन देणा-या या संस्थेला पवारनगर येथे पालिका प्रशासनाने शाळा क्रमांक १३३ ची जागा दिली. जुन्या पडक्या शाळेच्या जागेचा कायापालट करून संस्थेने काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने भव्य अत्याधुनिक स्वयंपाकगृह उभारले. आॅगस्ट २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या ‘अक्षयपात्र’मुळे गरीब सामान्यवर्गातील मुलांना आधार मिळाला आहे. आता त्याची वर्षपूर्ती होत आहे.
याठिकाणी मुलांना त्यांच्या ऐन जेवणाच्या वेळेत गरम, आरोग्यवर्धक, प्रोटीनयुक्त आहाराची पॅकेट्स पुरवली जातात. डाळ, भात, भाजी आणि चपाती अशा आहाराच्या पॅकेटचा यात समावेश असतो. ठाणे शहरातील भार्इंदरपाड्यापासून अगदी येऊरच्या पाटोणपाड्यापर्यंतच्या शाळेतील मुलांना हा आहार अत्याधुनिक वाहनांमधून पुरवला जातो.
पहाटे ५ पासून सुरू होणा-या या अत्याधुनिक स्वयंपाकगृहात सर्व पदार्थ बनवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारलेली आहे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून चपातीची प्रक्रिया होईपर्यंतचे सर्व काम मशीनवर होते. त्यामुळे अवघ्या तासाभरातच तीन हजार चपात्या याठिकाणी तयार केल्या जातात. भाजी कापणीपासून वरण हटवण्यापर्यंची सर्व कामेही यंत्राद्वारे होत असल्यामुळे अवघ्या १५ ते २० कर्मचा-यांमध्ये हा स्वयंपाक तास ते दीड तासात तयार होतो. अक्षयपात्रने ठाण्यात राबवलेल्या या उपक्रमाला ठाण्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे ‘अक्षयपात्र’ च्या ठाण्यातील व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Web Title: 'Akshayabatra' completed year of midday meal for serving 6000 students of Thane Municipal Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.