ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:43 PM2018-01-02T16:43:06+5:302018-01-02T16:45:57+5:30

नितिन कंपनी येथील उड्डाणुपलाच्या एक किमीच्या खालील बाजूस उद्यान विकसित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता माजिवडा उड्डाणपुलाखाली देखील अशा पध्दतीने उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

After successful experiments in the park under the bridge near Nitin company in Thane, Majhivad will also be using similar experiments. | ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार

ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार

Next
ठळक मुद्देकॅडबरीला होणार उड्डाणपुलाखाली उद्यानठाणेकरांसाठी ही उद्याने ठरत आहेत, विरंगुळ्याची केंद्र

ठाणे - एमएमआरडीएच्या अख्यत्यारीत असलेल्या नितिन कंपनी येथील उड्डाणपुलाच्या खाली उभारण्यात आलेल्या गार्डनला यश मिळाल्यानंतर पालिकेने मानपाडा पुलाखाली देखील असेच गार्डन सुरु केले आहे. त्यानंतर आता माजिवडा उड्डाणपुलाखालील जागेत देखील अशा पध्दतीने गार्डन तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळच्या सुमारास ठाणेकरांना विरंगुळ्यासाठी ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.
मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद असे दोन प्रमुख महामार्ग ठाणे तथा घोडबंदर भागातून जातात. या दोन्ही महामार्गांवरील चौकांमध्ये उड्डाण पुलांची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून उड्डाण पुलाखाली मोकळ्या जागेत अस्वस्छा तर काही ठिकाणी, अनाधिकृत गॅरेजवाल्यांनी तर काही ठिकाणी पार्कींग केली जात होती. या पुलाखाली अंधार असल्याने त्याठिकाणी गर्दुल्लेही वाढले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उड्डाणपुलाखाली उद्याानांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची परवानगी घेऊन त्याठिकाणी उद्याानांची उभारणीचे काम सुरु केले. दोन महिन्यांपुर्वी नितीन कंपनी आणि मानपाडा येथील उद्याानांचे काम पुर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका खाजगी शाळेच्या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांची सहल नितिन कंपनी येथील उद्यानात आली होती. या उद्याानांपाठोपाठ आता कॅडबरी आणि माजिवाडा या उड्डाण पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान उभारणीचे काम प्रशासनाने सुरु केले असून येत्या दोन ते तीन महिन्यात ही कामे पुर्ण केली जाणार आहेत. कॅडबरी-बाळकुम उड्डाणपुलाखाली असलेला परिसर केवळ हिरवागार केला जाणार असून त्याभोवती संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. दरम्यान सुशोभित करण्यात आलेल्या या परिसरात आता रंगेबेरंगी विद्यात रोषणाई करण्यात आली आहे. विविध प्रकारची फुल झाडे, नागरिकांना चालण्यासाठी मार्गिका, बच्चे कंपनीसाठी खेळणी, अशी व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. या सुशोभिकरणामुळे येथील रु पडे पालटले असून सायंकाळच्या वेळेस ही ठिकाणे नागरिकांची लक्ष वेधून घेत आहेत. या सर्वच उद्याानांच्या निर्मितीसाठी महापालिकेकडून कोणताही निधी खर्च करण्यात आला नसून शहरातील विकासकांच्या माध्यमातून ही उद्यााने उभारली जात असल्याची माहिती महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी महेश राजदरेकर यांनी दिली.


 

Web Title: After successful experiments in the park under the bridge near Nitin company in Thane, Majhivad will also be using similar experiments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.