अखेर मनसेनं उघडपणे 'बॉम्ब' वाटले, राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 07:46 PM2019-07-12T19:46:10+5:302019-07-12T19:49:01+5:30

मनसेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही बॉम्ब वाटप शुक्रवार 12 जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले होते.

After all, MNS slogan of Raj Thackeray's name and thrown bomb | अखेर मनसेनं उघडपणे 'बॉम्ब' वाटले, राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी

अखेर मनसेनं उघडपणे 'बॉम्ब' वाटले, राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देमनसेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही बॉम्ब वाटप 12 शुक्रवार आज होणार असल्याचे म्हटले होते.मुंबई, ठाण्यासह, विविध ठिकाणी हे बॉम्ब वाटप करण्यात आले.मनसेचे हे बॉम्ब म्हणजे सीड्स बॉम्ब आहेत. पावसाळा असल्याने पिकनिकसाठी गेल्यानंतर हे सीड्स बॉम्ब फेकण्याचे आवाहन मनसेनं केलं आहे.

मुंबई - लवकरच बॉम्ब वाटप करणार असल्याचे सांगत मनसेनं खळबळ उडवून दिली होती. नेहमीच, आपल्या आक्रमक शैलीमुळे मनसे आणि तिचे कार्यकर्ते असतात. तर, राज ठाकरेही अनेकदा गरज भासल्यास हिंसेचं समर्थन करतात. त्यामुळे मनसे आता नेमका कोणता बॉम्ब फोडणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली होती. मात्र, मनसेच्या या बॉम्ब नाट्याचा उलगडा झाला आहे. मनसेकडून आज बॉम्बवाटप करण्यात आलं. मनसेच्या ठाण्यातील महिलांना हे बॉम्बवाटप करण्यात आलं आहे. 

मनसेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही बॉम्ब वाटप शुक्रवार 12 जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार मुंबई, ठाण्यासह, विविध ठिकाणी हे बॉम्ब वाटप करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी करत बॉम्ब वाटप केले. तसेच, हे बॉम्ब फोडण्याचे आवाहनही, मित्र-नातेवाईकांसह नागरिकांना केलं आहे. मनसेचे हे बॉम्ब म्हणजे सीड्स बॉम्ब आहेत. पावसाळा असल्याने पिकनिकसाठी गेल्यानंतर हे सीड्स बॉम्ब फेकण्याचे आवाहन मनसेनं केलं आहे. त्यामुळे वृक्षारोपण वाढीस लागून पर्यावरणाचे संवर्धन होईल, असा मनसेचा हेतू आहे. मात्र, मनसेनं ज्याप्रमाणे या उपक्रमाचे प्रमोशन केले होते, त्यानुसार मनसे काहीतरी राजकीय धमाका करणार असे वाटत होते. पण, मनसेनं बॉम्ब वाटून पर्यावरणपूरक धमाका केला आहे. 


लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची भेट घेत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले. त्यानंतर, बॉम्ब वाटप करण्यात येणार असल्याचा दावा करून मनसेने खळबळ उडवून दिली होती. मनसेचे बॉम्बवाटप असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर, मनसेच्या बॉम्ब वाटपाची उत्सुकता संपली आहे.


Web Title: After all, MNS slogan of Raj Thackeray's name and thrown bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.