मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:23 AM2018-12-11T05:23:05+5:302018-12-11T05:23:40+5:30

गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली.

Adani will also give 'Adani' in Marathi | मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले

मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले

Next

मीरा रोड : गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली. व्यवस्थापनाने मात्र मराठी भाषेला प्राधान्यक्रमावर ठेऊन गुजराती भाषेत देयके दिली जातील, असे लेखी पत्रच शिवसेना आमदारांना दिले आहे. अदानी इलेक्ट्रीसीटी गुजराती भाषेतून देयके देण्यावर ठाम असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. सोमवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाईंदर फाटक येथील अदानी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.

दहा वर्षांपासून प्रकार सुरु
रिलायन्स एनर्जीकडे वीज पुरवठा असताना सुमारे दहा वर्षांपासून ग्राहकांच्या मागणीनुसार मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या चार भाषांमध्ये देयके दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Adani will also give 'Adani' in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.