तेल आणि दूधामध्ये भेसळ करणा-यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार -जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:51 PM2019-07-18T22:51:19+5:302019-07-18T23:18:34+5:30

शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टीक तसेच सकस अन्न पदार्थ मिळण्याबाबतची देशातील पहिली कार्यशाळा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

The action will be taken against the adulterants in oil and milk - Jayakumar Rawal | तेल आणि दूधामध्ये भेसळ करणा-यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार -जयकुमार रावल

देशातील पहिली कार्यशाळा ठाण्यात

Next
ठळक मुद्देशाळा महाविद्यालयांमधील उपहारगृहांमध्ये सकस अन्न मिळावेदेशातील पहिली कार्यशाळा ठाण्यातजंक फूडकडे युवापिढी आकर्षित होत असने चिंता

ठाणे: अयोग्य अन्न सेवनाने तसेच आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह आणि हह्दयरोगासारखे आजार आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांमधील उपहारगृहांबाबतचे धोरण विकसित करण्यात येणार आहे. तसेच तेल आणि दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी गुरु वारी दिला आहे.
शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टीक तसेच सकस अन्न पदार्थ मिळण्याबाबतची देशातील पहिली कार्यशाळा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, कोकण विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्यासह ठाणे, नवी मुंबई तसेच राज्यातील अनेक शाळा - महाविद्यालयांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. पोटाचे विकार वाढविणाºया जंक फूडकडे युवापिढी आकर्षित होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा अन्न पदार्थाची चव चांगली असली तरी त्याचे दूरगामी परिणाम हे वाईट आहेत. १२ ते १७ वयोगटातील तरु ण पिढीमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार बळावत असल्यामुळे मुलांना सकस आहार मिळावा, याकडे पालकांबरोबर शाळा महाविद्यालयाच्या प्रशासनानेही अधिक व्यापकपणाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी तेथील उपहारगृहांमध्ये प्रोटीनयुक्त सकस अन्न पदार्थांची विक्र ी करण्यावर शालेय प्रशासनाने जोर देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपहारगृहांबाबतचे धोरण विकसित केले जाणार आहे. फास्ट फूडला पर्याय शोधून ते हद्दपार करण्याची आवश्यकता आहे. उपहारगृहांमध्ये पाणी, अन्न पदार्थाची गुणवत्ता चांगली राखली जाण्याबाबतही अन्न व औषध प्रशासनाकडून आग्रह धरला जाणार असून तशी अंमलबजावणीही केली जाणार आहे. फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळांचीही संख्या वाढवून उपहारगृहांमध्ये तपासणी केली जाणार आहे. शाळा महाविद्यालय परिसरांमध्ये आरोग्यवर्धक तसेच गुणवत्ता न ठेवणाºया उपहारगृह चालकांवर कारवाईचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. स्वस्थ व निरोगी भारत घडविण्यासाठी ‘जंकफूड टाळूया आणि आपले आरोग्य सांभाळूया ’ असा संदेशही रावळ यांनी यावेळी दिला.
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही मुलांमध्ये वाढीस लागलेली जंकफूड खाण्याच्या वृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. ठाणे महापालिकांमधील शाळा तसेच श्री मॉ निकेतन सारख्या शाळांमधून पोषण आहाराची काळजी घेण्यात येत असल्याचा त्यांनी खास उल्लेख केला. सर्वच शाळांनी मुलांना पौष्टीक आहार मिळण्याच्या मोहीमेमध्ये सक्र ीय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
उपहारगृहांमधून तसेच शाळेतील डब्यांमध्ये पालकांनी कोणते जेवण द्यावे याकडे शालेय प्रशासनानेही अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे पल्लवी दराडे म्हणाल्या. दिवाळीतील फटाक्यांबद्दल ध्वनी व वायू प्रदूषणाची जनजागृती आणि धुळवडीमध्ये रंगांमुळे होणाºया प्रदूषणाबाबतच्या जनजागृतीमुळे जसे मुलांमध्ये सकारात्मक बदल झाले. तसेच सकारात्मक बदल आता योग्य आहाराबाबतच्या धोरणाने घडून येतील, असा विश्वासही दराडे यांनी व्यक्त केला.
यावेळी शाळेतून योग्य आहारासाठी पुढाकार घेणा-या नवी मुंबईतील लोकमान्य, होरायजन, सानपाडा आणि रिलायन्स या शाळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरु पात सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेला मुंबईचे एएफएसटीचे अध्यक्ष निलेश लेले, डॉ. प्रबोध हळदे आणि ईट राईट मुवमेंटचे डॉ. जगमित मदान यांनी मार्गदर्शन केले.
अन्न व औषध प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पोषक, पौष्टीक, सुरक्षित आणि स्वच्छतेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शत तत्वे दिली आहेत. ती आतापर्यंत १६ हजार ९२५ शाळा महाविद्यालयांमध्ये पोहचविण्यात आली आहेत. त्यापैकीच ठाणे आणि पालघर जिल्हयातील ६० शाळा महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपहारगृह चालक यावेळी उपस्थित होते.

Web Title: The action will be taken against the adulterants in oil and milk - Jayakumar Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.