अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:52 PM2018-12-14T23:52:31+5:302018-12-14T23:52:49+5:30

अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे.

Action on hawkers in Ambernath | अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे. या दादागिरीला लगाम लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर उशिरा का होईना शुक्रवारी पालिकेने पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई करत शिवाजी चौक मोकळा केला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येत आहे.

शिवाजी चौकातील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अनेक फेरीवाले रस्त्याच्याबाजूला राहून व्यवसाय करत असल्याने इतर वाहनांसाठी जागा शिल्लक राहत नव्हती. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशालाही बगल देत काही फेरीवाले हे स्टेशन परिसरापासून १०० मीटरच्या अंतरावरच बसत होते. १०० मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी नसतांनाही अनेक फेरीवाले हे स्टेशन परिसरातच बसतात. त्यांच्यावर कारवाई करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन चौकातील सर्व हातगाड्या जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. या हातगाडींवर अनेकवेळा दंड आकारूनही त्या गाड्या पुन्हा आहे त्याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने त्यांच्यावर कायमची कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेशन परिसरात १०० मीटरपर्यंत कुणालाच बसण्याचा अधिकार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Action on hawkers in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.