अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 09:12 PM2018-12-13T21:12:43+5:302018-12-13T21:17:11+5:30

घोडबंदर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमध्ये एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपीला अटक केल्याची घटना बुधवारी घडली.

Accused arrested for sexual assault on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

कासारवडवली पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देपुराणिक होम टाऊनमधील घटनाकासारवडवली पोलिसांची कारवाईअवघ्या तासाभरात आरोपीला अटक

ठाणे: घोडबंदर रोडवरील पुराणिक होम टाऊनमधील एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या करण आटाळकर (२५, रा. कोळीवाडा, कासारवडवली, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील पुराणिक होम टाऊनच्या क्लब होऊसमध्ये १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास करण याने पिडीत मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. शिवाय, याबबात कुठेही सांगितल्यास तिला मारण्याचीही धमकी दिली. या घृणास्पद प्रकाराची माहिती तिच्या आईला समजल्यानंतर तिने १२ डिसेंबर रोजी रात्री १० वा. च्या सुमारास याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार (३७६) सह पोक्सो लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखन करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एच. चौगुले या अधिक तपास करीत आहेत.
----------------

Web Title: Accused arrested for sexual assault on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.