खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा: संचित रजेतून पसार आरोपी १४ वर्षांनंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 09:05 PM2019-01-15T21:05:43+5:302019-01-15T21:21:53+5:30

एका खूनाच्या गुन्हयात जन्मनेपेची शिक्षा झाल्यानंतर संचित रजेवरुन किशोर गायकवाड पसार झाला होता. त्यानंतर तो तो पनवेलच्या तहसिलदार कार्यालयात दलालीचे काम करीत होता. याच कार्यालयात एका नोंदीसाठी मंडल अधिकारी महेश भाट यांच्या वतीने दहा हजारांची लाच स्वीकारतांना त्याला अटक झाली होती.

accused arrest who absconded after parol leave from 14 years for life imprisonment | खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा: संचित रजेतून पसार आरोपी १४ वर्षांनंतर जेरबंद

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई कळवा विटावा भागातून अटक मंडळ अधिकाऱ्याच्या वतीने नाव बदलून घेतली लाच

ठाणे: खूनाच्या गुन्हयामध्ये अलिबाग (जि. रायगड) न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगतांना पुण्यातील कारागृहात संचित रजेवर पसार झालेल्या किशोर गायकवाड (रा. वाकळनगाव, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मोठया कौशल्याने १४ वर्षांनंतर अटक केली आहे. पनवेल येथील मंडळ अधिकाºयाच्या वतीने दहा हजारांची लाच स्वीकारतांना तो पकडला गेला. याच प्रकरणात तो जामीनावर सुटल्यानंतर ठाणे पोलिसांना त्याला पकडले.
किशोर याने १९९७ मध्ये केलेल्या एका खूनाच्या गुन्हयामध्ये त्याला २००३ मध्ये अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो २००६ मध्ये सचिंत रजेवर सुटल्यानंतर येरवडा कारागृह पुणे येथे हजर होणे अपेक्षित होते. तो हजर न होता, पसार झाला झाला होता. याप्रकरणी ७ जानेवारी २०१३ रोजी नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संचित तसेच पॅरोल रजेवर पसार झालेल्या आरोपींना शोधण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. किशोर हा आपले नाव बदलून वावरत असून तो १४ जानेवारी रोजी विटावा येथे येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, उपनिरीक्षक सरक, हवालदार भिलारे, संभाजी मोरे, सुनिल जाधव, शिवाजी गायकवाड, नाईक दादा पाटील, अजय साबळे, राहूल पवार आणि नीलम वाकचौरे आदींच्या पथकाने ठाण्याच्या विटावा जकात नाका येथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर किशोर रामचंद्र म्हात्रे (४५, उसर्ली, ता. पनवेल, जि. रायगड) असे त्याने स्वत:चे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सखोल चौकशीमध्ये त्याने स्वत:चे नाव किशोर रघुनाथ गायकवाड असे सांगितले. त्याने त्याच्या साथीदारासह १ डिसेंबर १९९७ रोजी मुकूंद म्हात्रे (रा. रोहीजण, ता. पनवेल, जि. रायगड) याचा खून केल्याने त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात तो येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असतांना संचित रजेवर बाहेर पडला होता. उर्वरित रजा भोगण्यासाठी हजर होण्याऐवजी त्याने स्वत:चे नाव बदलून उसर्लीगाव येथे तो वास्तव्य करीत होता, अशीही माहिती त्याने पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली.

Web Title: accused arrest who absconded after parol leave from 14 years for life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.