पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:21 AM2018-07-17T02:21:53+5:302018-07-17T02:21:58+5:30

खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते.

 71 crore crop loan in Palghar | पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

Next

ठाणे : खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील ३२ हजार ६३ शेतकºयांना १६० कोटी १२ लाख ३९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. या शेतकºयांनी त्यांच्या २९ हजार ७८३.०५ हेक्टर शेतीवरील पिकांसाठी हे अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे. नऊ दिवसांच्या शेतकरी मेळाव्याद्वारे बहुतांशी शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले.
आतापर्यंत पीक कर्ज घेतलेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ६८५ शेतकºयांनी १६ हजार ६७३.९५ हेक्टर शेतावरील पिकांवर ८९ कोटी सात लाख ४६ हजारांचे पीक कर्ज घेतले. यामध्ये नियमित कर्ज भरणाºया ११ हजार ४९३ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांनी ५२ कोटी ९६ लाखांच्या कर्जाचा लाभ घेतला. या शेतकºयांना टीडीसीसी बँकेने त्यांच्या नऊ हजार ६५६.१५ हेक्टरवरील पिकांवर कर्ज दिले आहे. कर्जमाफी झालेले, कर्ज सवलत दिलेले आणि प्रोत्साहनपर कर्जलाभ मिळवलेल्यांमध्ये आठ हजार १९२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना ३६ कोटी ११ लाखांचा कर्जलाभ झाला आहे.
या पीक कर्जाचा सर्वाधिक शेतकºयांना लाभ घेता यावा, यासाठी टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्या शिष्टमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यांत नऊ दिवस शेतकरी मेळावे घेऊन जागृती केली. या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्यात ४५ कोटी ८५ लाख कर्जवाटप केल्याचे आढळून आले. सुमारे साडेतीन हजार शेतकºयांना या नऊ दिवसांच्या मेळाव्यादरम्यान पीक कर्जाचा लाभ दिल्याचे निदर्शनास आले. पालघर जिल्ह्यात मेळाव्यापूर्वी सुमारे आठ हजार ३१७ शेतकºयांना ५३ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप केले होते.
यामध्ये नियमित कर्ज भरणारे सात हजार ३३४ शेतकरी असून त्यांना ४२ कोटी १७ लाखांच्या पीक कर्जाचा लाभ झाला.
>६७ लाखांची इतर कर्जे
ठाणे जिल्ह्यात वाटप केलेल्या ८९ कोटींप्रमाणेच पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ कोटी चार लाख रुपये पीक कर्ज १२ हजार ३७८ शेतकºयांना वाटप केले आहे. याशिवाय, ८८ शेतकºयांना ६७ लाख ९४ हजारांची कर्ज सवलत दिल्याचे टीडीसीसी बँकेने स्पष्ट केले.

Web Title:  71 crore crop loan in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.