प्रवाशांना लुटणारे ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:02 AM2018-09-22T03:02:31+5:302018-09-22T03:02:34+5:30

लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

60 percent of trainee men in the middle class | प्रवाशांना लुटणारे ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरुष

प्रवाशांना लुटणारे ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरुष

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रेल्वेस्थानकात आरपीएफ अथवा रेल्वे पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या वेळी अनेक तृतीयपंथी धावत्या लोकलमधून उतरून पटरीतून धावत सुटतात. मात्र, तरीही ठाणे आरपीएफने मागील चार वर्षांत सुमारे ९३७ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. यात पकडलेल्या तृतीयपंथीयांपैकी ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई उपनगरीय रेल्वेबरोबरच मेल-एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांची गेल्या काही दिवसांपासून वर्दळ वाढू लागली आहे. त्यांच्या अश्लील हावभाव करण्याच्या सवयीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या डब्यात जाऊन पैसे मागण्याची जुनी पद्धत असली, तरी आता जनरल डब्यातही त्यांचे प्रस्थ हळूहळू वाढत आहे. त्यातच, रेल्वेस्थानकात आरपीएफ कारवाई करत असल्यामुळे लोकल-मेल-एक्स्प्रेसमधून प्रवाशांकडून पैसे गोळा केल्यानंतर स्थानक येण्याअगोदर ही मंडळी चालत्या गाडीतून उतरते. अनेक तृतीयपंथी रेल्वे पटºयांमध्ये धावण्यात माहीर आहेत.
त्यामुळे पटरीतून त्यांना पकडणे काहीसे अवघड जात असले, तरी आरपीएफकडून राबवल्या जाणाºया विशेष मोहिमेत अनेक तृतीयपंथी जाळ्यात अडकतात. मागील चार वर्षांत ठाणे आरपीएफने ९३७ तृतीयपंथीयांंवर कारवाई करून न्यायालयात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोटाची खळगी भरण्यासाठी मार्ग
तृतीयपंथीयांची कटकट नको म्हणून प्रवासी त्यांना पैसे देतात. दिवसभरात चांगली कमाई होत असल्याने आता स्त्रीवेशातील पुरुष तृतीयपंथीयांची संख्या वाढते आहे. नोकरी-व्यवसाय नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक पुरु ष हे तृतीयपंथीयांचा वेश करून भटकत असतात. ठाणे आरपीएफने ठाणे ते कल्याणदरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल ६० टक्कयांहून अधिक तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याचे सांगण्यात आले.
>एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तन
रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाºया तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येते. सर्वाधिक मेल-एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तन करणाºया तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. ते एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनल) येथून सुटणाºया मेल-एक्स्प्रेस अथवा कल्याण स्थानकात चढून मुंबईकडे जाणाºया गाड्यांमध्ये बसतात. अप आणि डाउन मार्गांवरील बहुतांशी गाड्या ठाणे खाडीपुलावर सावकाश धावतात. याचाच फायदा घेऊन ते चालत्या गाडीतून उतरताना दिसून येतात. कारवाईत पकडलेल्या तृतीयपंथीयांकडून ५०० ते १५०० रु पये दंड वसूल केला जात असून आतापर्यंत ज्यांनी दंड भरला नाही, अशा १० टक्के तृतीयपंथीयांना जेलची हवा खावी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>भीक मागून प्रवाशांना नाहक त्रास देणाºयांविरोधात भारतीय रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केले जाते. त्यानुसार, या वर्षातील जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत ठाणे-कल्याणदरम्यान ९३४ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. तर, नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई आणखी तीव्र केली आहे.
- राजेंद्र पांडव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ

Web Title: 60 percent of trainee men in the middle class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.