१९ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ४३ लीटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:12 PM2019-04-24T23:12:02+5:302019-04-24T23:12:25+5:30

शाईच्या चार हजार ३५४ बाटल्या वितरित

43 liters ink to the fingers of 19 lakh voters | १९ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ४३ लीटर शाई

१९ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ४३ लीटर शाई

Next

- हितेन नाईक 

पालघर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. या मतदार संघातील १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांच्या तर्जनीवर हि खूण करण्यासाठी ४३ लिटर्स शाईचा वापर होणार आहे.

पालघर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून जसजशी ही तारीख जवळ येत आहे तसे जिल्हा प्रशासनातील कार्यालयातील निवडणूक विभाग वेगवान पद्धतीने दिवस-रात्र कामात जुंपलेला दिसत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले असून या असंख्य साहित्यापैकी शाईचे महत्वही महत्वपूर्ण समजले जात आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात अशा एकूण २ हजार १७७ मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन अशा एकूण ४ हजार ३५४ शाईच्या बाटल्या वितरित करण्यात येणार आहेत. एका बाटलीत १० मिली. निळी शाई भरण्यात आलेली असून एक बाटलीतील शाई सुमारे ५०० मतदारांच्या तर्जनीवर लावण्यास पुरेशी मानली जाते. त्यामुळे एका मतदान केंद्रावर दोन बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. वर्ष २००४ च्या निवडणुकीत मतदान करताना मतदारांच्या बोटावर केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्या ऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिल्याने जास्त शाईचा वापर होत आहे. मतदान केंद्रात आल्यावर शासनप्राप्त ओळ्खपत्राद्वारे मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याला मतदान करण्यासाठी आत प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी वर शाई लावल्या नंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनी वर शाई लागलेली असेल तर त्या मतदारांना मतदान करू दिले जात नाही.

कोणत्या बोटावर लागते शाई
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.

म्हैसूरची शाई
यासाठी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीतून जगातील २५ देशांना तीचा पुरवठा केला जातो. ही शाई लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही.

१९६२
च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.

Web Title: 43 liters ink to the fingers of 19 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.