अकस्मात मृत्यूंच्या ३७० प्रकरणांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 07:22 PM2018-02-14T19:22:15+5:302018-02-14T19:22:53+5:30

ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

370 cases of accidental deaths will be investigated by the Collector Office | अकस्मात मृत्यूंच्या ३७० प्रकरणांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणार  

अकस्मात मृत्यूंच्या ३७० प्रकरणांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणार  

Next

ठाणे -  ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  मनपा हद्दीत  एकुण दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्याकडून जानेवारी२०१७ ते डिसेबंर २०१७ या कालावधीत एकुण ४८६ मयत व्यक्तींच्याप्रकरणांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्यापैकी ११६प्रकरणांमध्ये यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत.
370 मयत इसमांची यादी मयतांच्या मृत्यूचे कारण व नातेवाईक/खबर देणाऱ्याच्या नावासह खालील कार्यालयांमध्ये प्रसिध्द करणेत आलेली आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे संकेतस्थळावर (www.thane.nic.in), उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, ठाणे217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम), तहसिलदार कार्यालय, ठाणे  जिल्हा परिषद ठाणे समोर, स्टेशन रोड ठाणे, (प)

उपरोक्त ठिकाणी मयत इसमांच्या मृत्युबाबत/कारणाबाबत त्यांचे नातेवाईक, हितसंबंधित अथवा अन्य कोणासही संशय/तक्रार/हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे/साक्ष देणेची असल्यास संबंधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्या पासुन 07 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे विभाग ठाणे, पत्ता- 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे कार्यालयीन वेळेत हजर राहुन आपले म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरुपात सादर करावे. विहीत मुदतीत कोणाच्याही हरकती/तक्रार प्राप्त न झाल्यास या संदर्भात कोणाचीही हरकत नाही असे ग्राहय धरुन अकस्मात मृत्युबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील.

Web Title: 370 cases of accidental deaths will be investigated by the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.