34 thousand affordable houses in Thane-Kalyan, 100 hectares land in MHADA land | ठाणे-कल्याणमध्ये ३४ हजार स्वस्त घरे, म्हाडाला एक रुपयात शंभर हेक्टर जमीन
ठाणे-कल्याणमध्ये ३४ हजार स्वस्त घरे, म्हाडाला एक रुपयात शंभर हेक्टर जमीन

ठाणे - सर्वसामान्य, गरीब कुटुंबीयांना त्यांच्या घरांचे स्वप्न साकारता यावे व त्यांना माफक दरात घराची खरेदी करता यावी, यासाठी केवळ एक रूपयांत १०० हेक्टर जमीन म्हाडाला दिली आहे. त्यावर तयार होणा-या सुमारे ३४ हजार घरांमुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतेकांची गृह समस्या लवकरच सुटणार असल्याचा दावा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
जिल्हाधिकरी कार्यालयात ‘सिद्धी २०१७ ते संकल्प २०१८’ यावर आधारित विविध विषयांवर वर्षभरात केलेल्या कामांसह पुढील वर्षात हाती घेतलेल्या कामांचा उहापोह कल्याणकर यांनी केला. सतत वाढणाºया घरांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांपासून ते गरीब कुटुंबियापर्यंतच्या प्रत्येकाकडून स्वत:च्या घराचे स्वप्न भंगल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, जिल्हाधिकाºयांनी १०० हेक्टरवरील ३४ हजार घरांची स्वप्नपूर्ती लवकरच होणार असल्याचे उघड केले. माफक व परवडणाºया दरातील या घरांसह पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास, शबरी ठक्करबाप्पा आदी आवास योजनेच्या घरांचाही आढावाही त्यांनी घेतला. यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई या योजनांची चार हजार ९४८ घरे जिल्ह्यात बांधण्याची योजना नुकतीच सुरू झाली आहे. तालुका पातळीवरील सततच्या पाठपुराव्यामुळे प्रथम हप्त्यासह दुसरा हप्ता तीन हजार ८८६ घरकुलांना मिळाला आहे, तर ७९४ घरकुलांना तिसरा हप्तादेखील दिला आहे. २०१७-१८ साठी ७१७ घरांचे लक्ष आहे. यासाठी ७४७ लाभार्थींची नोंदणी झाल्याचेदेखील जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणेकरांच्या मुबलक पाण्यासाठी शाई-काळू या दोन धरणांपैकी एकाची निवड होणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. एवढेच नव्हे, तर मुुंब्य्राजवळील ब्रिटीशकालीन धरणाचीदेखील ठाणेकरांच्या पाण्यासाठी पाहणी केली आहे. पूर्वी या धरणाच्या पाण्याचा वापर रेल्वेसाठी केला जात असे. पण आता त्याचा वापर होत नाही. ठाणेकरांसाठी या धरणाचा वापर करणे शक्य आहे का, यासाठी त्यांची पाहणी केली आहे. या धरणाच्या खाली सर्वदूर झोपड्या पसरलेल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु, पाण्याची गरज लक्षात घेता शाई- काळूपैकी एक धरण निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.
भावली पाणीपुरवठा योजनेतून दुष्काळप्रवण अशा शहापूरच्या गावाना पाणीपुरवठा तसेच मुरबाडमधील गावांना पिंपळगाव जोगा या धरणांमधून नैसर्गिक गुरूत्त्वाकर्षण पद्धतीने करण्यास मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये सातबारा किआॅस्कमुळे छापील व डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे योग्य ती फी भरून नागरिकांना मिळत आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख कातकरी समाजातील नागरिकांना विविध दाखले दिले. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा योजना, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन, २०४ पेसा ग्रामपंचायतींनी निवड करून विकास, वनहक्क कायद्याचा पुरेपूर लाभ, पर्यटन विकास, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, हागणदारीमुक्त ठाणे जिल्हा, ठाण्यात महिला बचत गटांसाठी आधुनिक विक्री केंद्र, दुर्मीळ ग्रंथाचे जतन करण्याच्या उद्देशाने डिजिटायझेशन, स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान प्रकल्पासाठी अंतर्गत रस्ते, बैठकीची व्यवस्था, राज्य राखीव पोलीस बल गट क्र .११ कॅम्प बाळेमध्ये संगणक कक्ष, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त केलेल्या खेळांडूसाठी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकचे साहित्य वाटपाला गती दिल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत वीज नसलेले २४ आदिवासी, कातकरी पाडे शहापूरच्या तालुक्यात आढळून आले आहेत. त्यांची प्रत्यक्ष पाहाणी करून या गावात दोन महिन्यात वीजपुरवठ्यासाठी वनखाते व विद्युत विभाग यांच्यात समन्वय करून प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय भिवंडी, मुरबाड या तालुक्यातील आदिवासींच्या गावांचादेखील शोध घेऊन तेथे वीजपुरवठा प्राधान्याने करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. एवढेच नव्हे तर शहापूर, मुरबाड या तालुक्यातील तरूणांच्या हाताला काम देण्यासह त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

मानव विकास निर्देशांकानुसार या तालुक्यांचा विकास अत्यल्प असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वांगिण प्रगती होऊनही कमी दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी आदिवासी कातकरी उत्थान योजना हाती घेतली आहे. या भागाच्या विकासाकरिता कौशल्य विकास,कातकरी उत्थान,सिंचन सुधारण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.

दोन तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्र माच्या विशेष निधीतून जनतेचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न पुढील वर्षभरात करण्यात येतील. ग्रामीण भागातील युवकांची कौशल्यवृद्धी, आदिवासींमधील सर्वात मागास अशा कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे त्याचप्रमाणे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन आणि शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा संकल्प असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसह ठाणे जिल्ह्यात बँकांनी १०० कोटींचे पिक कर्ज वाटप केल्याचे सांगितले.

शेतकरी उत्थानासाठी प्रयत्न

चार हजार ८०० हेक्टरवर जिल्ह्यात भाजीपाला लागवड केली. कृषी विभाग यांच्या मदतीने भेंडी तसेच बटाटा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणे, तसेच कुक्कुटपालन व इतर कृषी आधारित उद्योग वाढविण्यासंदर्भात औरंगाबाद येथे मानव विकास आयुक्त यांना चार कोटी रु पयांचा एक प्रस्ताव दिला आहे.
आतापर्यंत चार हजार १५६ मेट्रिक टन फळे व भाजीपाल्यांची मालाची विक्र ी २१ आठवडी बाजारातून झाली आहेत. कृषी यांत्रिकीकरण एक कोटी तीन लाखातून केले.
जलयुक्त शिवारसाठी सीएसआरमधून
खासगी कंपन्यांची मदत घेऊन विविध बंधाºयामधून जवळजवळ पावणे दोन लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. जलयुक्तच्या कामांसाठी यंदा १५ कोटींचा निधीची उपलब्धता आहे.
 


Web Title:  34 thousand affordable houses in Thane-Kalyan, 100 hectares land in MHADA land
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.