२७ हजार तळीरामांची उतरली झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:46 AM2018-03-08T06:46:17+5:302018-03-08T06:46:17+5:30

मागील तीन वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे २७ हजार तळीरामांची झिंग उतरवली आहे. तसेच या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल दोन हजार ४०० तळीरामांना पकडून त्यांच्याकडून जवळपास १४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 27 thousand paleas of Ramdev's zig | २७ हजार तळीरामांची उतरली झिंग

२७ हजार तळीरामांची उतरली झिंग

Next

- पंकज रोडेकर
ठाणे - मागील तीन वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे २७ हजार तळीरामांची झिंग उतरवली आहे. तसेच या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल दोन हजार ४०० तळीरामांना पकडून त्यांच्याकडून जवळपास १४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर, ठाणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर आणि होळी-धूळवड या दिवसांत राबवलेल्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ या विशेष मोहिमेत दोन हजार मद्यपींवर कारवाई केली. गतवर्षात मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया सर्वाधिक एक हजार ४९ तळीरामांना उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी पकडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळे आहेत. यामध्ये वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून त्याद्वारे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यावर कारवाई केली जात आहे. यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया वाहनचालकावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या नियमानुसार कारवाई दरवर्षीच केली जाते.
त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत २६ हजार ६८० तळीरामांची झिंग उतरवली आहे. यामध्ये २०१५ या वर्षात ४४१८ जणांना पकडले, तर २०१६ मध्ये ही कारवाई तीव्र केल्याने त्या वर्षभरात कारवाईचा आकडा तिपटीने वाढला. त्यावेळी हा आकडा १२ हजार २४८ वर गेला होता. मात्र, २०१७ ला हा आकडा १० हजार १४ आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उपशाखेनुसार दाखल झालेल्या केस

गतवर्षातील कारवाईचा वाहतूक पोलिसांच्या उपशाखांचा विचार केल्यास सर्वाधिक १०४९ केसेस उल्हासनगरात दाखल झाल्या आहेत. त्यापाठोपाठ कल्याणात ९५२ केसेस नोंदवल्या आहेत. सर्वात कमी केसेस राबोडीत १४० दाखल आहेत.

मुंब्य्रात ७२२, भिवंडी ५६९, कोनगाव ४१२, विठ्ठलवाडी ४३७, अंबरनाथ-बदलापूर ५०२, कासारवडवली ७६४, ठाणेनगर ३७८, कोपरी २४३, नौपाडा ७६२, वागळे इस्टेट ७३२, कापूरबावडी ४१७, कळवा ४८७, नारपोली ३७४, कोळसेवाडी ५२४ आणि डोंबिवली ५५० असे तळीराम पकडले आहेत.

दोन महिन्यांत
२४०० केस
या वर्षातील पहिल्याच महिन्यात १,४२५ मद्यपींना वाहन चालवताना पकडून त्यांच्याकडून नऊ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. फेब्रुवारीत ९६७ तळीरामांवर केसेस दाखल करून चार लाख ६५ हजारांचा दंड आकारल्याची माहिती पोलिसांनी दिली.

३१ डिसेंबरप्रमाणे यंदा होळी-धुळवडीला वाहतूक शाखेद्वारे विशेष मोहीम हाती घेतली होती. ३१ डिसेंबरला १,३२७ तर होळी-धुळवडीला ६५६ मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया चालकांविरोधात कारवाई केली आहे. या दोन्ही कारवाईचा आकडा इतर पोलीस दलांपेक्षा अधिक आहे. तर, सणाचे पावित्र्य राखण्यासाठी या दिवसांत विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.
- प्रशांत सतेरे, पोलीस निरीक्षक, प्रशासन विभाग

Web Title:  27 thousand paleas of Ramdev's zig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.