धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:05 AM2018-12-01T00:05:07+5:302018-12-01T00:05:19+5:30

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ...

15% reduction in drought, scarcity of scarcity | धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

Next

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पाण्याचा वाढता अपव्यय टाळण्याची गरज असून तरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या टाळणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.


यंदा जून, जुलैत पडलेल्या पावसामुळेच धरणसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर, पावसाचा जोर कमी होत गेला. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही होत असून उपसाही मनमानीपणे केला जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित केले. यामुळे नोव्हेंबरपासूनच ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे.


१५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू केलेली पाणीकपात भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.

धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ‘दशलक्ष घनमीटर’मध्ये
                धरण आजचा पाणीसाठा             मागील वर्षीचा पाणीसाठा
भातसा            ७३५.७८.( ७८.१० टक्के)     ८३९.५६ (८९.१२ टक्के)
मोडकसागर     ३७.८६ (२९.३६ टक्के)       ९१.५३ (७०.९९ टक्के)
तानसा               १००.९८ (६९.६० टक्के)     १२१.१३ (८३.४९ टक्के)
बारवी                १९३.२९ (८२..९३ टक्के)    २१४.४२ (९२ टक्के)
मध्य वैतरणा      १५४.८२ (८० टक्के)           १६३.६५ (८४.५६ टक्के)

Web Title: 15% reduction in drought, scarcity of scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण