हिरानंदानींसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:31 AM2018-09-01T03:31:23+5:302018-09-01T03:31:41+5:30

सातबाऱ्यावर बेकायदा फेरफार प्रकरण : न्यायालयाने दिले होते आदेश

14 people guilty of cheating on Hiranandani | हिरानंदानींसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

हिरानंदानींसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

Next

ठाणे : सातबारा उताºयावर बेकायदा फेरबदल करून विकासकरार करून इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्यासह १४ जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या १४ जणांमध्ये तत्कालीन तलाठ्याचाही समावेश आहे.

मुंबईत सेल्स कमिशन एजंट म्हणून काम करणाºया राजेश गांधी (४५, रा. माहीम) यांच्या नातेवाइकांनी काही वर्षांपूर्वी घोडबंदर भागात शेतजमीन खरेदी केली होती. यापैकी कोलशेत येथील १७.७५ गुंठे जमिनीची १९३९ सरकारी दरबारी नोंद केली होती. तिची देखभाल गांधी यांचे आजोबा फौजमल पूनमचंद करत होते. मात्र, आजोबांच्या मृत्यूनंतर जमिनीची जबाबदारी गांधी यांच्या वडिलांवर आली. त्यांच्याही निधनानंतर राजेशच स्वत:चा व्यवसाय सांभाळून जमिनीची देखभाल करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना जमिनीकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. परंतु, गेल्या वर्षी त्यांच्या कुटुंबाने ही जमीन विक्र ीसाठी काढली. त्यामुळे कागदपत्रांबाबत कोलशेत येथील तलाठी कार्यालयात चौकशी केली, तेव्हा जमिनीच्या सातबाºयावर दुसºयांचीच नावे होती. शिवाय, सातबाºयावर रोमा बिल्डर्सचा बोजा आणि नागरी वसाहत विकास करण्याकामी मंजुरी आदी नोंदीही होत्या. याबाबत, राजेश यांनी तहसील कार्यालयातून माहिती अधिकारांतर्गत माहिती काढल्यानंतर वेगळीच माहिती उघड झाली.

तत्कालीन तलाठ्याशी संगनमत करून पूनमचंद यांच्या नावात फेरफार क्र मांक २१० अन्वये फेरबदल करून त्याठिकाणी फेरफार क्र मांक सातबाºयावर दुसºयांच्या नावाची नोंद केल्याचे आढळले. तसेच, २००७ मध्ये रोमा बिल्डर्स प्रा.लि.तर्फे संचालक निरंजन हिरानंदानी यांनी चंद्राबाई पाटील, नूतन पाटील, पुष्पा पाटील, प्रियंका गोंधळे, बाला गोंधळे, योगिता पाटील, दीपक पाटील आदींसोबत सर्वेक्षण जमीन विकसित करण्यासाठी विकासकरार केल्याचेही गांधी यांना समजले. अशा प्रकारे जमिनीच्या सातबारा उताºयावर बेकायदा फेरबदल करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने जमिनीचे टायटल क्लीअर नसतानाही विकासकरार केला. जमिनीवर इमारत बांधत ४८ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. फेरफारमध्ये बनावट नोंदी केल्याचाही आरोप असून याप्रकरणी गांधी यांनी न्यायालयात धाव घेऊन तक्रार केली होती.

सत्यता पडताळून करणार कारवाई

न्यायालयाच्या आदेशानंतर २९ आॅगस्ट रोजी रोमा बिल्डर्स प्रा. लिमिटेड तसेच संचालक हिरानंदानी यांच्यासह महेश पमनानी, आत्माराम जगताप यांच्यासह १४ जणांविरु द्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा १५६-३ अन्वये दाखल झाला आहे.

च्यातील सत्यता पडताळून कारवाई करण्यात येणार असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात निरंजन हिरानंदानी यांच्या कार्यालयात वारंवार संपर्क साधला असता ते एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यात टाळाटाळ करण्यात आली.

Web Title: 14 people guilty of cheating on Hiranandani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.