‘एसआरए’साठी ११४ घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:16 AM2018-10-20T00:16:31+5:302018-10-20T00:16:53+5:30

ठाणे : येथील पोखरण रोड नं. २ वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील सुमारे ११४ पेक्षा अधिक घरे शुक्रवारी जमीनदोस्त ...

114 houses to be destroyed for 'SRA' | ‘एसआरए’साठी ११४ घरे जमीनदोस्त

‘एसआरए’साठी ११४ घरे जमीनदोस्त

Next

ठाणे : येथील पोखरण रोड नं. २ वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील सुमारे ११४ पेक्षा अधिक घरे शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आली. पात्र रहिवाशांना एसआरएची घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.
या कारवाईआधी रहिवाशांची अन्यत्र निवासव्यवस्था करण्यात आली असून काही रहिवासी ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये, तर काहींनी भाड्याची घरे घेऊन निवासव्यवस्था केली आहे. यासाठी संबंधित विकासकाने रहिवाशांना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत विकासकाला घरभाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचीही तरतूद आहे. मात्र, रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती. त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण, आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशांना नोटीस बजावून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 114 houses to be destroyed for 'SRA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.