विसर्जन मिरवणुकीत ठाण्यात १०० डेसिबलचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:13 AM2018-09-19T04:13:03+5:302018-09-19T04:13:07+5:30

ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना डीजेचा दणदणाट

100 Decibel Balloons in Thane in Dismissal Process | विसर्जन मिरवणुकीत ठाण्यात १०० डेसिबलचा दणदणाट

विसर्जन मिरवणुकीत ठाण्यात १०० डेसिबलचा दणदणाट

Next

ठाणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. असे असले तरी ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना डीजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ध्वनी मर्यादेने १०० डेसिबल गाठल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी ढोलताशा, फटाक्यांची आतशबाजी आणि डीजेचा दणदणाट झाला होता. त्यामुळे तो आता १० दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीतही तो वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. असे असतानाही ठाण्यात डीजेचा दणदणाट होणार हे मनसे आणि राष्टÑवादीने स्पष्ट केले होते. बेडेकर यांनी शहरातील १० ठिकाणच्या ध्वनीची पातळी तपासली असता, राम मारुती रोड येथे रात्री ८.२०च्या सुमारास ९० ते ९५ डेसिबल, गोखले रोड ९५ ते १०० डेसिबल, मल्हार सिनेमा ९०, बाफना सर्जिकल सर्व्हिस रोड ८५ ते ९०, वर्तकनगर ९० ते ९५, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी ८५ ते ९०, शास्त्रीनगर ९५ ते १००, टीएमसी निपुण हॉस्पिटल ८५ ते ९०, पाचपाखाडी ९५ आणि देवधर हॉस्पिटल गोखले रोड येथे आवाजाची पातळी ही १०० डेसिबलपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.

नियम धाब्यावर
पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेसोबत ढोलताशा, अ‍ॅम्प्लीफायर्स आदींचा दणदणाट दिसून आल्याचे महेश बेडेकर यांनी सांगितले. काही राजकीय पक्षांनी यासंदर्भात आधीच सूतोवाच केले होते. मिरवणुकीत ते खरे ठरले.

Web Title: 100 Decibel Balloons in Thane in Dismissal Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.