इंग्रजीच्या पायाभूत चाचणीचे १० गुण अचानक घटले, शिक्षण खात्याची चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:44 AM2017-11-11T00:44:23+5:302017-11-11T00:44:42+5:30

पायाभूत चाचणी परीक्षेची सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ६० ऐवजी ५० गुणांचीच आल्याने शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे.

The 10 points of the English standard test suddenly dropped, the education department's mistake | इंग्रजीच्या पायाभूत चाचणीचे १० गुण अचानक घटले, शिक्षण खात्याची चूक

इंग्रजीच्या पायाभूत चाचणीचे १० गुण अचानक घटले, शिक्षण खात्याची चूक

Next

जान्हवी मोर्ये 
डोंबिवली : पायाभूत चाचणी परीक्षेची सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ६० ऐवजी ५० गुणांचीच आल्याने शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे. लेखी आणि तोंडी (मौखिक) अशी ६० गुणांची प्रश्नपत्रिका आतापर्यंत होती. ती अचानक दहा गुणांनी कमी झाल्याचे शाळांनी लक्षात आणून दिल्यावर शिक्षण खात्याने चूक सुधारण काही प्रश्नांचे गुण वाढून त्याची भरपाई करून हा घोळ निस्तरण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, विज्ञान, गणित आणि इंग्रजी या चार विषयांची पायाभूत चाचणी ८ नोव्हेंबरपासून सुरू आहे. आजवर ५० गुण लेखी परीक्षेचे आणि १० गुण मौखिक अशी विभागणी होती. पण सातवीची इंग्रजी विषयाची प्रश्नपात्रिका ६० गुणांऐवजी ५० गुणांची आली. त्यात ४० गुण लेखी परीक्षेचे व १० गुण मौखिक अशी रचना आहे. परीक्षा सुरु असताना हा प्रकार समोर आल्याने गोंधळ उडाला.
याविषयी काही शाळांनी शिक्षण खात्याच्या विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा शिक्षण खात्याने त्यांच्याकडून झालेली चूक मान्य केली. तसेच सुधारित गुण दिले जातील, असे सांगितले.
तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी वेगवेगळ््या वयोगटातील असल्याने त्यांना सारखेच शब्द, सारखेच उतारे, सारखेच प्रश्न व सारखीच गोष्ट असलेली प्रश्नपत्रिका देण्यासही काही शिक्षकांनी आक्षेप घेतला.
सातवीच्या इंग्रजीतील गुणांचा घोळ लक्षात आल्यावर सरकारने पत्रक काढले. प्रश्न क्रमांक दोन हा दोन गुणांऐवजी चार गुणांचा, प्रश्न क्रमांक तीन १६ ऐवजी २० गुणांचा, प्रश्न क्रमांक चार १४ ऐवजी १८ गुणांचा केला आहे. पहिल्या प्रश्नात आणइ तोंडी परीक्षेच्या गुणात मात्र बदल केलेला नाही.
हे गुण वाढवून देणारे पत्रक सोशल मीडियावरून शाळांत पोचविले जात आहे. पण ते अनेक शाळांपर्यंत पोचलेले नाही.
प्रश्नपत्रिकेत चूक हा शिक्षण खात्याचा अपमान असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी मांडले. ही प्रश्नपत्रिका तयार करणाºयांची विद्या प्राधिकरणाने चौकशी करावी आणि यातील दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: The 10 points of the English standard test suddenly dropped, the education department's mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.