...म्हणून रॉजर फेडररच्या आयुष्यात 'आठ' या संख्येला विशेष स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 02:56 PM2017-10-30T14:56:08+5:302017-10-30T14:59:01+5:30

एकतर या संख्येला तो 'लकी' मानतो आणि यंदाच्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर लक्षात येईल की त्याच्यासाठी 'आठ' खरोखरच विशेष आहे.  

... as a special place for the number eight in Roger Federer's life | ...म्हणून रॉजर फेडररच्या आयुष्यात 'आठ' या संख्येला विशेष स्थान

...म्हणून रॉजर फेडररच्या आयुष्यात 'आठ' या संख्येला विशेष स्थान

googlenewsNext

- ललि्त झांबरे

जळगाव - रॉजर फेडररच्या आयुष्यात 'आठ' या संख्येला विशेष स्थान आहे. एकतर या संख्येला तो 'लकी' मानतो आणि यंदाच्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर लक्षात येईल की त्याच्यासाठी 'आठ' खरोखरच विशेष आहे.  पहिली गोष्ट म्हणजे त्याने  यंदा आठव्यांदा विम्बल्डन जिंकले. 

दुसरी बाब म्हणजे  यंदा आठ स्पर्धांची त्याने अंतिम फेरी (ऑस्ट्रेलियन ओपन, इंडियन वेल्स, मियामी, हॅले, विम्बल्डन, शांघाय, स्वीस आणि कॅनेडियन ओपन)  गाठली.  आणि तिसरी बाब म्हणजे फेडेक्सने आपल्या गावची म्हणजे स्वीत्झर्लंडमधल्या बेसेल येथील स्पर्धासुध्दा आठव्यांदा जिंकली. म्हणजे इंग्रजीत Gr8 जसे लिहितात तशी 'एट' ही संख्या खऱ्या अर्थाने फेडररसाठी ग्रेट ठरतेय. 

एरवीसुध्दा फेडरर आठ ही संख्या लकी मानत आला आहे. कोणत्याही सामन्याच्या आरंभी आठ एसेस लगावण्याची आणि दोन सेटदरम्यान आठवेळा टॉवेलने शरीर पुसण्याची त्याची सवयच आहे. याशिवाय त्याच्या किटमध्येही बरोब्बर आठ रॅकेट आणि आठ पाण्याच्या बाटल्या तो ठेवत असतो. आता ही श्रध्दा की अंधश्रध्दा? योग्य की अयोग्य, हा वेगळा विषय आहे. परंतु 'एट' मागे वेडा असलेल्या फेडररला यंदा एट'नेच अधिक ग्रेट बनवले आसल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: ... as a special place for the number eight in Roger Federer's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.