धक्कादायक...गतविजेत्या रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 08:06 PM2019-01-20T20:06:13+5:302019-01-20T20:06:55+5:30

स्पर्धेच्या चौथ्या फेरीत फेडररला ग्रीसच्या 20 वर्षीय स्टेफानोस स्तिस्तीपासने 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला.

Shocking ... ending the challenge of defending champion Roger Federer in Australian open tennis | धक्कादायक...गतविजेत्या रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात

धक्कादायक...गतविजेत्या रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात

Next

सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : गतविजेत्या रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत फेडररला ग्रीसच्या 20 वर्षीय स्टेफानोस स्तिस्तीपासने 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला.




फेडररला या स्पर्धेचा संभाव्य विजेता समजले जात होते. फेडरर यावेळी जेतेपद पटकावून हॅट्ट्रिक साजरी करेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण या स्पर्धेच्या चौथ्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या फेरीतील पहिला सेट फेडररने जिंकला होता. पण त्यानंतर त्याने सलग तीन सेट गमावले आणि त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.



Web Title: Shocking ... ending the challenge of defending champion Roger Federer in Australian open tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.