हालेपला धक्का देत सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत; जोकोविचचीही कूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:18 AM2019-01-22T04:18:12+5:302019-01-22T04:18:17+5:30

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने आक्रमक खेळ करीत सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील सिमोना हालेपचा पराभव करत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Serena Williams knocked out of the quarter-finals Jochovichi traveled | हालेपला धक्का देत सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत; जोकोविचचीही कूच

हालेपला धक्का देत सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत; जोकोविचचीही कूच

Next

मेलबोर्न : अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने आक्रमक खेळ करीत सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील सिमोना हालेपचा पराभव करत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्सांडर झ्वेरेवला मात्र गाशा गुंडाळावा लागला.
सेरेनाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आक्रमक खेळ करताना रोमानियाची अव्वल मानांकित खेळाडू हालेपचा ६-१, ४-६, ६-४ ने पराभव करीत मार्गारेट कोर्टच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. या शानदार विजयानंतर सेरेना म्हणाली, ‘मी लढवय्या असून सहजासहजी पराभव मानत नाही.’ झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिसकोव्हानेही धक्कादायक निकाल नोंदवताना दोन ग्रँडस्लॅम विजेत्या गर्बाईन मुगुरुजाचा ६-३, ६-१ ने सहज पराभव केला.
पुरुष एकेरीत चौथे मानांकन प्राप्त झ्वेरेवला कॅनडाच्या मिलोस राओनिचविरुद्ध ६-१, ६-१, ७-६(७/५) ने पराभव स्वीकारावा लागला. १६ व्या मानांकित राओनिचला पुढच्या फेरीत फ्रान्सच्या २८ व्या मानांकित लुकास पाऊलेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पाऊलेने क्रोएशियाच्या ११ व्या मानांकित बोर्ना कोरिचचा ६-७ (४), ६-४, ७-५, ७-६(२) ने पराभव केला.
>संघर्षपूर्ण लढतीत नोवाक जोकोविच विजयी
सर्बियाचा स्टार नोवाक जोकोविचने सलग दुसऱ्या सामन्यात एक सेट गमावल्यानंतर १५ व्या मानांकित दानिल मेदवेदेवचा पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचने या लढतीत ६-४, ६-७(५/७), ६-२, ६-३ ने विजय मिळविला. त्याला पुढच्या फेरीत आठव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मेदवेदेवविरुद्ध ३ तास १५ मिनिट रंगलेल्या लढतीत झुंजार खेळ केलेल्या जोकोविचला ट्रेनरची मदत घ्यावी लागली.
>जपानच्या केई निशिकोरीने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात शानदार विजय मिळवला. स्पेनच्या पाब्लो कारेनो बस्टाविरुद्ध पहिले दोन सेट गमावून पिछाडीवर पडलेल्या निशिकोरीने झुंजार खेळ करत अप्रतिम पुनरागमन केले आणि हा सामना ६-७(८-१०), ४-६, ७-६(७-४), ६-४, ७-६(१०-८) असा जिंकला. तब्बल ५ तासांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात निशिकोरीने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे या स्पर्धेत दुसºयांदा निशिकोरी पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात लढला. आता कारकिर्दीत चौथ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या निशिकोरीपुढे नोवाक जोकोविच आणि दानिल मदवेदेव यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

Web Title: Serena Williams knocked out of the quarter-finals Jochovichi traveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.