राफेल नदालचा सोपा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:01 AM2018-05-19T00:01:51+5:302018-05-19T00:02:30+5:30

राफेल नदालने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यावर सोपा विजय मिळवला. तर नोवाक जोकोविच याने पुनरागमन करताना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली.

Rafael Nadal's simple win | राफेल नदालचा सोपा विजय

राफेल नदालचा सोपा विजय

googlenewsNext

रोम : राफेल नदालने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यावर सोपा विजय मिळवला. तर नोवाक जोकोविच याने पुनरागमन करताना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. २०१८ मध्ये पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये जोको पोहचला आहे. जोकोविच याने गेल्या वर्षी जुलैनंतर पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेत अंतिम आठमध्ये जागा बनवली आहे. त्याने स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलास याला ६-१, ७-५ असे पराभूत केले. रोममध्ये चार वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच आॅस्ट्रेलियन ओपननंतर सहा महिने दुखापतीमुळे कोर्टच्या बाहेर होता.
गेल्या वर्षी अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करणाऱ्या जर्मनीचा आलेक्सांद्र जोवरेव हादेखील अंतिम आठमध्ये पोहचला आहे. त्याने ब्रिटनच्या काईल एडमंड याला ७-५, ७-६ (१३/११) असे पराभूत केले. जेवरेवचा पुढचा सामना बेल्जियमच्या डेविड गॉफिनसोबत होईल.
अर्जेंटिनाचा पाचवा मानांकित जुआन मार्टिन डेल पेट्रो सामन्यातून बाहेर पडल्याने डेविड अंतिम आठमध्ये पोहचला. (वृत्तसंस्था)
> नदाल याने शापोवालोवला ६-४, ६-१ असे पराभूत केले. त्याचा पुढचा सामना इटलीच्या फॅबियो फोगनिनी सोबत होणार आहे. त्याने जर्मनीच्या पीटर गोजोंविस्कीला ६-४, ६-४ असे पराभूत केले. जर नदाल याने येथे आपले आठवे विजेतेपद जिंकले तर तो रॉजर फेडररला मागे टाकून जगातील नंबर वन खेळाडू बनू शकतो.

Web Title: Rafael Nadal's simple win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.