राफेल नदालने राखले वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:30 AM2018-08-14T04:30:20+5:302018-08-14T04:30:39+5:30

दिग्गज टेनिसपटू स्पेनच्या राफेल नदालने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना टोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

Rafael Nadal dominates | राफेल नदालने राखले वर्चस्व

राफेल नदालने राखले वर्चस्व

Next

टोरंटो : दिग्गज टेनिसपटू स्पेनच्या राफेल नदालने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना टोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नदालचे हे कारकिर्दीतील एकूण ८०वे विजेतेपद ठरले. अंतिम सामन्यात नदालने युवा स्टीफानोस सितसिपासला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीची पराभूत केले.
सरळ दोन सेटममध्ये बाजी मारत नदालने यूनानच्या सितसिपासला ६-२, ७-६(७-४) असे नमवले. १ तास ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सहज आघाडी घेतलेल्या नदालला दुसऱ्या सेटमध्ये सितसिपासकडून कडवी झुंज मिळाली. हा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर नदालने आक्रमक खेळ करत बाजी मारली.

Web Title: Rafael Nadal dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.