झ्वेरेवला पराभवाचा धक्का; डॉमनिक थिएमने नोंदवला धक्कादायक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:44 PM2018-06-05T23:44:22+5:302018-06-05T23:44:22+5:30

गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली.

 Pushing defeat; Dominic Thimny reports a shocking victory | झ्वेरेवला पराभवाचा धक्का; डॉमनिक थिएमने नोंदवला धक्कादायक विजय

झ्वेरेवला पराभवाचा धक्का; डॉमनिक थिएमने नोंदवला धक्कादायक विजय

Next

पॅरिस : गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली. आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम याने सरळ तीन सेटमध्ये झ्वेरेवचा धुव्वा उडवत दिमाखात आगेकूच केली. त्याचवेळी, महिलांच्या गटात अमेरिकेच्या १३व्या मानांकीत मॅडिसन कीज हिने अपेक्षित विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गेल्या दीड वर्षांपासून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर झ्वेरेवने टेनिसविश्वाचे लक्ष वेधले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या झ्वेरेवला फ्रेंच ओपनमध्ये दुसरे मानांकन लाभले होते. रॉजर फेडरर, अँडी मरे या दिग्गजांची अनुपस्थिती आणि दिग्गज नोव्हाक जोकोविच याच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे यंदाच्या फ्रेंच ओपनची लढत नदाल व झ्वेरेव यांच्यात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र. थिएमने अप्रतिम खेळ करताना सामना अक्षरश: एकतर्फी ठरवत सर्वांचे अंदाज चुकविले.
केवळ १ तास ५० मिनिटांमध्ये थिएमने ६-४, ६-२, ६-१ असा धडाकेबाज विजय मिळवताना आपला अत्यंत जवळचा मित्र असलेल्या झ्वेरेवला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पहिल्या सेटमध्ये केलेला प्रतिकार वगळता झ्वेरेव त्यानंतर थिएमपुढे आव्हानही उभे करु शकला नाही. पहिला सेट जिंकल्यानंतर थिएमला पुढील दोन सेट जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. दरम्यान, या लढतीत झ्वेरेवला गुडघा दुखीचाही त्रास झाला आणि यामुळे खेळताना त्याला खूप अडचण झाली. मात्र, असे असले तरी त्याने सामना अर्धवट सोडला नाही आणि यामुळे प्रेक्षकांनीही त्याची प्रशंसा केली. आता उपांत्य सामन्यात थिएमचा सामना इटलीचा मार्को सेचिनातो आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्यातील विजेत्याशी होईल.
सध्या थिएम तुफान फॉर्ममध्ये असून यंदाच्या मोसमात त्याने संभाव्य विजेत्या आणि क्ले कोर्टचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालला नमविले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमात नदालला क्ले कोर्टवर नमविणारा थिएम एकमेव खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याचा विजय स्पर्धेतील इतर खेळाडूंसाठी एक प्रकारे धोक्याचा इशाराच ठरला आहे. त्याचबरोबर थिएमने झ्वेरेवला धक्का देत सलग तिसºयांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. थिएमविरुद्ध एकतर्फी पराभव झालेल्या झ्वेरेवकडून ४२ चुका झाल्या. तसेच संपूर्ण सामन्यात त्याने केवळ १९ विनर लगावले. (वृत्तसंस्था)

मॅडिसनची आगेकूच
महिलांमध्ये अमेरिकेच्या मॅडिसन किज हिने अपेक्षित विजयी आगेकूच करताना उपांत्य फेरी गाठली. किजने कझकिस्तानच्या युलिया पुतिनत्सेवा हिचा ७-६(७-६), ६-४ असा पराभव केला. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर किजने वेगवान खेळ करताना युलियाला पुनरागमनाची फारशी संधी न देता मोक्याच्यावेळी खेळ उंचावत बाजी मारली.

Web Title:  Pushing defeat; Dominic Thimny reports a shocking victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा