पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 10:20 PM2018-11-29T22:20:38+5:302018-11-29T22:21:11+5:30

विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंकिता रैना आणि करमन कौर थांडी या भारतीय खेळाडूंना दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी आहे.

Pune Open ITF Women's Tennis : Ankita Raina, Karan Kaur have the opportunity of double crown | पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी

पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी

Next

पुणे  - विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंकिता रैना आणि करमन कौर थांडी या भारतीय खेळाडूंना दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी आहे. गुरूवारी अंकिता, करमन यांच्यासह स्लोव्हेनियाची तामरा झिदनसेक, स्पेनची इवा गुरेरो अल्वारेज यांनीही एकेरी प्रकारातून उपांत्य फेरी गाठली. शिवाय दुहेरी अंकिता-करमन जोडीने दुहेरी प्रकारातून अंतिम फेरीत धडक दिली आहे.

नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस येथे सुरू आहे. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित अंकिताने विजयी घोडदौड कायम राखताना चीनच्या कै लीन झाँगचा हिचे आव्हान ६-०, ६-० असे सहजपणे संपुष्टात आणले. हा सामना ५३ मिनिटे चालला. चौथ्या मानांकित करमनने १ तास ५४ मिनिटे रंगलेल्या लढतीत युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवाचा टायब्रेकमध्ये ७-६(९), ६-२ असा पराभव केला.
स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने रशियाच्या मरिना मेलनिकोवा हिच्यावर ३-६, ६-०, ६-३ अशा फरकाने सरशी साधत अंतिम ४ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना १ तास ४५ मिनिटे चालला. पहिला सेट जिंकून आघाडी घेणाºया मरिनाने नंतर मात्र सामन्यावरील पकड गमावली. स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाºया रोमानियाच्या जॅकलीन एडिना क्रिस्टियनची कौतुकास्पद वाटचाल ६-२, ६-२ने रोखली.

अंकिता-करमन आणि अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्गेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) यांच्यात दुहेरी गटाची अंतिम लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत अंकिता-करमन या भारतीय जोडीने रशियाची अमिना अंशबा व पोलंडची कनिया पॉला यांच्या जोडीवर ६-३, ६-३ने मात करून अंतिम फेरी गाठली. दुसºया उपांत्य फेरीत अलेक्झांड्रा-तामरा जोडीने कॅ नडाची शेरॉन फिचमन आणि पोलंडची कातरझायना पीटर यांच्या जोडीवर ६-१, ६-४ने विजय मिळविला.


निकाल :
एकेरी : उपांत्यपूर्व फेरी : करमन कौर थांडी (भारत) वि. वि. व्हॅलेरिया स्राखोवा (युक्रेन) ७-६ (९), ६-२. अंकिता रैना (भारत) वि. वि. कै लीन झाँग (चीन) ६-०, ६-०. तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. मरिना मेलनिकोवा (रशिया) ३-६, ६-०, ६-३. इवा गुरेरो अल्वारेज (स्पेन) वि. वि. जॅकलीन एडिना क्रिस्टियन (रोमानिया) ६-२, ६-२.

दुहेरी गट : उपांत्य फेरी : अंकिता रैना(भारत)-करमन कौर थांडी (भारत) वि. वि. अमिना अंशबा (रशिया)-कनिया पॉला (पोलंड) ६-३, ६-३. अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्गेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. शेरॉन फिचमन (कॅनडा)-कातरझायना पीटर (पोलंड) ६-१, ६-४.

Web Title: Pune Open ITF Women's Tennis : Ankita Raina, Karan Kaur have the opportunity of double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.