डोंबिवलीत पलावामध्ये रंगला 'पलासो२०१८' क्रीडामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:12 PM2018-01-22T12:12:56+5:302018-01-22T12:19:37+5:30

खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस लागण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक लहान मुलांसह ज्येष्ठांनीही किमान तासभर तरी खेळावे यासाठी स्पोर्ट्स काऊन्सिल पलावा या संस्थेने पुढाकार घेत काटई येथिल पलावा गृहसंकुलात पलासो क्रीडामहोत्सव २०१८ चे आयोजन केले आहे.

'Palaaso 2018' Krida Mahotsav in Dombivliit Palava | डोंबिवलीत पलावामध्ये रंगला 'पलासो२०१८' क्रीडामहोत्सव

डोंबिवलीत पलावामध्ये रंगला 'पलासो२०१८' क्रीडामहोत्सव

Next
ठळक मुद्दे* स्पोर्ट्स काऊन्सिल पलावाचा पुढाकार२० ते २८ जानेवारी या कालावधीत आठवडाभर विविध स्पर्धाचे आयोजन

डोंबिवली: खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस लागण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक लहान मुलांसह ज्येष्ठांनीही किमान तासभर तरी खेळावे यासाठी स्पोर्ट्स काऊन्सिल पलावा या संस्थेने पुढाकार घेत काटई येथिल पलावा गृहसंकुलात पलासो क्रीडामहोत्सव २०१८ चे आयोजन केले आहे.
यशस्वी सायकल रॅलीनंतर आता काटई येथिल पलावा गृहसंकूलात २० ते २८ जानेवारी या कालावधीत क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात बॅटमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, कराटे, टेबल टेनीस, व्हॉलीबॉल, स्विमींग, स्केटिंग, कॅरम यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले असून त्याला पलावामधील हजारो खेळप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली.
शनिवारच्या शुभारंभाला पलावामध्ये मशाल रॅली काढण्यात आली. गृहसंकुलातच असलेल्या सुसज्ज मैदानात त्याचे आयोजन केले होते. त्यावेळी हजारो प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावत खेळाचे महत्व जाणले. अबालवृद्धांनी मशाल रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आनंद लुटला. स्पोर्टस काउन्सिलचे अभिषेक जैन, रुपाली रेपाळे, इरफान हाजी, अशोक सुरतकर, तुषार वैद्य आदींनी या उपक्रमाचे शिस्तबद्ध आणि एका विशिष्ठ रचनेत आयोजन केले. त्यामुळे सहभागी होणा-या स्पर्धकांसह खेळ बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये जल्लोष, आनंदाचे वातावरण होते. या आणि भरपूर खेळा असे सांगत हा क्रीडामहोत्सव सुरु झाल्याचे अभिषेक जैन सांगतात. ते म्हणाले की, धावपळीच्या जीवनात खेळाकडे दुर्लक्ष होते, मोबाईल गेम्स, टॅब-लॅपटॉप, संगणक यांमुळे अबालवृद्ध मैदानापासून दुरावत चालली आहेत. ते होऊ नये यासाठी स्पोर्ट्स काऊन्सिल पलावाच्या माध्यमाने मुलांसाठी वर्षभर नानाविध स्पर्धा भरवल्या जातात. तसेच केवळ स्पर्धाच नाहीत तर मुलांनी खेळाकडे आकर्षित व्हावे यासाठी विविध सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा महोत्सव सुरु असून आगामी काळात अधिकाधीक व्यापक प्रमाणावर त्याचे आयोजन करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. या महोत्सवामध्ये केवळ लहान मुले, मुलीच नव्हे तर युवा वर्ग, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आदींच्याही स्पर्धांचे आयोजन केले असून सगळेजण आपापल्या परिने कुणी स्पर्धेत तर कुणी स्पर्धकांचा हौसला वाढवण्यासाठी एकत्र येतात. खेळ सुरु असतांना हीप हीप हु..रेरे चा नाद देत मजा लुटतात. यामुळे हे गृहसंकुल एक कुटुंब असून त्यातून एकात्मतेची भावना जोपासण्याचा हा प्रयत्न आहे.
या महोत्सवात पलावा स्पोटर््समन आॅफ द इयर, पलावा इमर्जिंग यूथ आॅफ द इयर, पलावा स्पोटर््स पर्सन आॅफ इच गेम, पलावा रायझिंग स्टार्स सिलेक्टेड बाय स्पोर्ट्स काऊन्सिल, पलावा बेस्ट क्लस्टर अँड बेस्ट स्पोटर््स अ‍ॅवॉर्ड असे विविध पारितोषिक देऊन स्पर्धकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे जैन म्हणाले. या सोहळयाच्या शुभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन ‘लोकमत’ मुंबईचे मानव संसाधन, व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक सचिन लिगाडे देखिल उपस्थित होते.
---------------

Web Title: 'Palaaso 2018' Krida Mahotsav in Dombivliit Palava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.