नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:27 AM2018-06-10T03:27:35+5:302018-06-10T03:27:35+5:30

स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला.

Nadal targets 11th French Open champion | नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर

नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर

Next

पॅरीस -  स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला.
३२ वर्षांच्या खेळाडूने १६ मेजर विजेतेपद पटकावले आहे. तो आता आपल्या २४ व्या ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये रोलंड गॅरोजवर डोमनिक थिएम विरोधात लढेल. त्यामुळे नदाल मारग्रेट कोर्टच्या सर्वकालिक विजेतेपदाची बरोबरी करेल. नदाल आता त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू रॉजर फेडररपेक्षा चार मेजर विजेतेपदांनी मागे आहे. फेडरर नदालपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे.
राफेल नदाल याने उपांत्य फेरीच्या सामन्यात जुआन मार्टिन डेल पेट्रोला ६-४,६-१, ६-२ असे पराभूत केले. फ्रेंच ओपनमध्ये हा त्याचा ८५ वा विजय आहे. त्याला येथे केवळ दोनच वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
नदालला गुडघा आणि मनगटाच्या दुखापतीमुळे आठ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांमध्ये खेळता आले नाही. रविवारी आपले १७ वे ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याच्या प्रेरणेने तो खेळणार आहे.
अंतिम फेरीत आॅस्ट्रियाच्या २४ वर्षांच्या थिएमशी भिडेल. या दोघांमध्ये ९ वेळा सामने झाले आहेत. सर्वच सामने क्ले कोर्टवर झाले आहेत.
डोमिनिक थिएम म्हणाला की,‘माझा सामना नदालसोबत होणार आहे. त्यामुळे माझ्यावर दबाव आहे.’

येथे खेळणे हे माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी राहिले आहे. मला वाटते की कारकिर्दीत मर्यादित संधी असतात. मी दुखापतींमुळे अनेक संधी गमावल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे दहापेक्षा जास्त संधी नाही. - राफेल नदाल



अखेर सिमोना ग्रॅण्ड स्लॅम जिंकली

पॅरीस : स्लॅमलेस नंबर वन अशी हिणवली जाणाऱ्या रुमानियाच्या सिमोना हालेप हिने अखेर ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर तिने शनिवारी आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात सिमोनाने अमेरिकेच्या स्लोएन्स स्टिफन्सवर तीन सेटमध्ये ३-६,६-४,६-१ असा विजय मिळवला.
तिसºया सेटपर्यंत संघर्षमय झालेल्या या सामन्यात निर्णायक सेटमध्ये मात्र सिमोनाने ५ -० अशी मुसंडी मारली होती. त्यानंतर स्टिफन्सने १ गेम जिंकत पराभव लांबवला. मात्र जबरदस्त फॉर्मममध्ये असलेल्या नंबर वन सिमोनाला ती रोखू शकली नाही. सिमोनाने या आधी या स्पर्धेची तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. आणि गेल्या दोन वेळची ती उपविजेती होती.
दोन तास तीन मिनिटे चालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये स्टिफन्सने वर्चस्व गाजवले. तिने पहिला सेट फक्त ४१ मिनिटात जिंकला. आणि दुसºया सेटमध्ये चौथ्या ब्रेकपॉईंटवर पहिला गेम जिंकला त्या वेळी असे वाटले होते की, हालेप पुन्हा एकदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत होईल.
हालेपने त्यानंतर १३ पैकी १२ गुण घेत सामना पालटला. दुसरीकडे अमेरिकन ओपन विजेती स्टिफन्स फोरहॅण्डवर चुका करत होती. सिमोना हालेपने दुसरा सेट जिंकून सामना निर्णायक सेटपर्यंत खेचला. तिसºया सेटमध्ये स्टिफन्स सुुरुवातीपासूनच दबावात होती. आणि ती पुनरागमन करू शकली नाही. या सेटवर सिमोनाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. एक वर्ष आधी येलेना ओस्टापेनाकोने सिमोना हालेपवर फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला होता.

मला दिलेल्या पाठिंब्याबात सर्वांचेच आभार, अखेरच्या गेममध्ये मी श्वास देखील घेऊ शकत नव्हते. मागच्या वर्षी झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती मला यंदा होऊ द्यायची नव्हती. मी टेनिस खेळायला लागल्यापासूनचे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे. माझा विश्वास बसत नाही. - सिमोना हालेप

Web Title: Nadal targets 11th French Open champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.