डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:48 PM2017-11-22T21:48:38+5:302017-11-22T21:49:14+5:30

भारताची अव्वल एकेरी टेनिसपटू अंकिता रैना हिने आपल्या लौकिकानुसार चमकदार कामगिरी करताना डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अंकिताने रशियाची बिगरमानांकीत वेरॉनिका कुदेरमेतोवा हिला सरळ दोन सेटमध्ये नमवून दिमाखात आगेकूच केली.

India's Ankita Raina's winning salute in WTA tennis tournament | डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

googlenewsNext

मुंबई : भारताची अव्वल एकेरी टेनिसपटू अंकिता रैना हिने आपल्या लौकिकानुसार चमकदार कामगिरी करताना डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अंकिताने रशियाची बिगरमानांकीत वेरॉनिका कुदेरमेतोवा हिला सरळ दोन सेटमध्ये नमवून दिमाखात आगेकूच केली. या स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंना वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता. त्यापैकी तिघींचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारताच्या आशा अंकितावर होत्या. 
चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत २९३व्या स्थानी असलेल्या अंकिताने आक्रमक व सकारात्मक सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत आपल्याहून सरस असलेल्या वेरॉनिकाला (२३३) तीने ७-६(२), ६-३ असा धक्का दिला. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर अंकिताने दुस-या सेटमध्ये जबरदस्त आक्रमक पवित्रा घेत वेरॉनिकाला पुनरागमनाची संधी दिली नाही. 
दरम्यान, या सामन्यात अंकिताला आपल्या चुकांचा फटकाही बसला. पहिल्या सेटमध्ये ४-० अशी जबरदस्त आघाडी घेतल्यानंतरही तिला पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकावा लागला. पाचव्या गेमपासून पुनरागमन करताना वेरॉनिकाने आपली पिछाडी ४-५ अशी कमी करत सामन्यात रंग भरले. यानंतर टायब्रेकमध्ये अंकिताने ७-२ अशी बाजी मारत सामन्यात आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करताना अंकिताने वेरॉनिकाची सर्विस ब्रेक करत ४-१ अशी आघाडी घेतली. यावेळी, तिने आपली लय न गमावता अखेरपर्यंत आघाडी कायम राखत बाजी मारली. 
दुसरीकडे, युक्रेनच्या ओल्गा इआनचुक हिने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने जपानच्या जुनरी नामीगाताने आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत २१०व्या स्थानी असलेल्या जुनरीने पहिला सेट ६-१ असा सहजपणे जिंकून दमदार आघाडी घेतली. दुसºया सेटमध्येही जुनरी ५-४ अशी आघाडीवर होती, परंतु याचवेळी ओल्गाने दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने जुनरीचा दुसºया फेरीत सहज प्रवेश झाला. 

- अन्य लढतीत थायलंडच्या पिएंगटार्न प्लिपुएच हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना सहाव्या मानांकीत ऑस्ट्रेलियाच्या लिझेट काबरेरा हिचे आव्हान ७-६, ६-२ असे संपुष्टात आणले. पहिला सेट चुरशीचा झाल्यानंतर दुस-या सेटमध्ये प्लिपुएचने जबरदस्त वेगवान खेळ करताना आपल्याहून सरस असलेल्या काबरेराला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. त्याचप्रमाणे, स्पर्धेत अव्वल मानांकन लाभलेल्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाने अपेक्षित सुरुवात करताना आॅस्ट्रेलियाच्या प्रिसिला होनचा ७-५, ६-१ असा पराभव केला. 

Web Title: India's Ankita Raina's winning salute in WTA tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा