इंडियन वेल्स एटीपीमध्ये प्रजनेशने नोंदवला सनसनाटी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:53 AM2019-03-11T04:53:33+5:302019-03-11T04:53:44+5:30

जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या निकोलोजला नमविले

In the Indian Wells ATP, Prasannesh registered the sensational victory | इंडियन वेल्स एटीपीमध्ये प्रजनेशने नोंदवला सनसनाटी विजय

इंडियन वेल्स एटीपीमध्ये प्रजनेशने नोंदवला सनसनाटी विजय

Next

इंडियन वेल्स : पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारताच्या प्रजनेश गुणेश्वरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय नोंदवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या निकोलोज बासिलाशविलीचा पराभव केला. या पातळीवर प्रथमच एकेरीच्या मुख्य फेरीत खेळत असलेल्या डावखुºया प्रजनेशने २ तास ३२ मिनिटांत जॉर्जियाच्या खेळाडूचा ६-४, ६-७, ७-६ ने पराभव केला.

जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानी असलेल्या प्रजनेशने पहिल्या सेटच्या पाचव्या गेममध्ये बासिलाशविलीची सर्व्हिस भेदली आणि आपली सर्व्हिस कायम राखत ३१ मिनिटांमध्ये सेट जिंकला. दुसºया व तिसºया सेटममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. दोन्ही सेट टायब्रेकपर्यंत लांबले. प्रजनेशने तिसरा व निर्णायक सेट जिंकत आगेकूच केली. प्रजनेश म्हणाला, ‘निश्चितच ही खडतर लढत होती. माझ्या मते मी गेल्या फेरीच्या तुलनेत यावेळी चांगला खेळ केला. मी दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळत असल्यामुळे चांगला खेळ करावाच लागणार होता. अव्वल २० मधील खेळाडूविरुद्ध सर्वोत्तम खेळ करणे अपेक्षितच होते.’

प्रजनेशला आता तिसºया फेरीत जागतिक क्रमवारीत ८९ व्या स्थानावर असलेला खेळाडू इवो कार्लोविचच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यासह खेळताना स्कॉटलंडच्या जेमी मरे आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांना ६-४, ६-४ असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

फ्रेटेनगेलोला नमवत जोकोव्हिच तिसºया फेरीत
नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेचा क्वालिफायर ब्योर्न फ्रेटेनगेलोचा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. जानेवारीमध्ये सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर प्रथमच सामना खेळत असलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल जोकोव्हिचने ७-६(७/५), ६-२ ने विजय नोंदवला. त्याला पुढच्या फेरीत जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कोलश्रेबरने निक किर्गियोसचा ६-४, ६-४ ने पराभव केला.

क्विटोवाचा पराभव करीत व्हीनस पुढच्या फेरीत
सातवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन व्हीनस विलियम्सने एक सेट गमाविल्यानंतर दमदार पुनरागमन करीत तिसºया मानांकित पेत्रा क्विटोवाचा पराभव करुन तिसरी फेरी गाठली. व्हीनसने शनिवारी क्विटोव्हाविरुद्ध ४-६, ७-५, ६-४ ने सरशी साधली. व्हीनसला तिसºया फेरीत मायदेशातील सहकारी क्रिस्टीना मॅकहेलच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मॅकहेलने रशियाच्या ३० व्या मानांकित अनास्तासिया पावलुचेनकोव्हाचा ६-४, ३-६, ६-४ ने पराभव केला.

Web Title: In the Indian Wells ATP, Prasannesh registered the sensational victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस