लंडन : एका प्रदर्शनीय सामन्यात टेनिसचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर स्कर्ट घालून खेळल्याने क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरला. स्कॉटलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यात अँडी मरेविरुद्ध खेळताना फेडरर आपल्या देशाच्या पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच स्कर्ट घालून कोर्टवर उतरला होता.

मरे आणि फेडरर यांनी मदतनिधी उभारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याची सुरुवात पारंपरिक वेशभूषा परिधान करून केली. या सामन्यात मी पारंपरिक कपडे परिधान करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आयोजकांनी तत्काळ ही इच्छा पूर्ण करताना माझ्यासाठी एका स्कर्टची व्यवस्था केली. या वेळी, फेडररने स्कर्ट घातल्यानंतर लगेच मरेनेही स्कॉटलंडची ओळख असलेली पारंपरिक टोपी परिधान करून खेळण्यास सुरुवात केली. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला. स्कर्ट घालून खेळतानाही फेडररने जबरदस्त खेळ करताना मरेचा ६-३, ३-६, १०-६ असा पराभव केला.

मला आश्चर्य वाटते की, आयोजकांनी इतक्या कमी वेळेत माझ्यासाठी स्कर्टची व्यवस्था कशी काय केली. ज्यावेळी मी स्कर्ट काढला तेव्हा मी बिनाकपड्यांचा असल्याचे भासले. हा खूप शानदार, वजनदार आणि वेगळा अनुभव होता. -रॉजर फेडरर


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.