फेडरर, कॅरोलिना चौथ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:26 AM2018-03-14T04:26:10+5:302018-03-14T04:26:10+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्विझर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्या वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Federer, Carolina fourth round | फेडरर, कॅरोलिना चौथ्या फेरीत

फेडरर, कॅरोलिना चौथ्या फेरीत

Next


इंडियन वेल्स (यूएस) : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्विझर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्या वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिलांच्या गटात अमेरिकन ओपनची विजेती स्लोएने स्टीफेन्स व कॅरोलिना वोज्नियाकी यांनी प्रतिस्पर्ध्यांना आणि व्हीनस विल्यम्सने आपली बहीण सेरेनाला पराभूत केले.
पुरुषांच्या एकेरीत ३६ वर्षीय फेडररने सर्बियाच्या फिलीप क्राजिनोव्हिचला ५८ मिनिटांत ६-२, ६-१ गुणांनी सरळ दोन सेटमध्ये घरी पाठविले. फेडररचा पुढील सामना जेरामी चार्डीविरुद्ध होणार आहे. ज्याने फ्रान्सच्या एड्रियन मानारिनोला ७-५, ४-६, ६-१ असे पराभूत केले. दुसरीकडे टेलर फ्रिट्जने फर्नांडो वर्डास्कोला ४-६, ६-२, ७-६, क्रोएशियाच्या बोरना कोरिचने रॉबर्टो बातिस्ताला ६-१, ६-३ गुणांनी नमविले. महिलांच्या गटात व्हीनस विल्यम्सने आपली बहीण सेरेनाला ६-३, ६-४ असे नमविले. अमेरिकन ओपनची विजेती स्लोएने स्टीफेन्सकडून जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या डोरिया कासात्किनाला ४-६, ३-६ पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे कॅरोलिना वोज्नियाकीने अलेक्जेंद्रा सेस्नोव्हिचला ६-४, २-६, ६-३ असे पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Web Title: Federer, Carolina fourth round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.