फेडरर पुन्हा अव्वल स्थानी, नदालची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 04:40 AM2018-05-15T04:40:36+5:302018-05-15T04:40:36+5:30

माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या राफेल नदालने जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले असून स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर पुन्हा एकदा एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झाला आहे.

Federer again tops the table, Nadal's fall | फेडरर पुन्हा अव्वल स्थानी, नदालची घसरण

फेडरर पुन्हा अव्वल स्थानी, नदालची घसरण

Next

पॅरिस : माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या राफेल नदालने जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले असून स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर पुन्हा एकदा एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झाला आहे.
मार्च महिन्यानंतर टेनिस कोर्टवर न उतरल्यानंतरही फेडररने सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या मानांकनामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन नोव्हाक जोकोव्हिचला माद्रिदमध्ये दुसऱ्या फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची झळ बसली. त्याची सहा स्थानांनी घसरण झाली असून तो १८ व्या स्थानी पोहोचला आहे. या स्पर्धेत जेतेपद पटकावणाºया अलेक्जेंडर ज्वेरेवने तिसरे स्थान कायम राखले आहे.
माद्रिद मास्टर्समध्ये नदालचा पराभव करणाºया डोमिनिक थियेमची (आठवे स्थान) एका स्थानाने घसरण झाली आहे. त्याला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह अँडरसन कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या स्थानी दाखल झाला. मानांकनामध्ये सर्वाधिक लाभ या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाºया डेनिस शापोवालोव्हला झाला आहे. त्याने १४ स्थानांची प्रगती करताना २९ वे स्थान गाठले आहे.
महिलांमध्ये माद्रिद ओपनमध्ये विजय मिळवणाºया चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाला दोन स्थानांचा लाभ झाला आहे. ती मानांकनामध्ये आठव्या स्थानी आहे. अंतिम फेरीत क्विटोवाविरुद्ध पराभव स्वीकारणाºया किकी बेर्टींसने मानांकनामध्ये पाच स्थानांची सुधारणा केली असून ती १५ व्या स्थानी आहे. मानांकनामध्ये रोमानियाची सिमोना हालेप, डेन्मार्कची कॅरोलिन व्होज्नियाकी आणि स्पेनची गारबाईन मुगुरुजा अव्वल स्थानी कायम आहे. (वृत्तसंस्था)
>युकी व पेस यांची घसरण
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरीची एटीपीमध्ये आज जाहीर झालेल्या विश्व क्रमवारीत एकेरीमध्ये आठ तर दुहेरीमध्ये लिएंडर पेसची एका स्थानाने घसरण झाली आहे. युकीने अव्वल १०० मध्ये स्थान कायम राखले आहे. तो ९४ व्या स्थानी आहे. भारतीयांमध्ये त्याच्यानंतर रामकुमार रामनाथन (१२४) व प्रजनेश गुणेश्वरन (१७५) यांचा क्रमांक येतो.
दुहेरीत रोहण बोपन्नाने २३ वे स्थान कायम राखले असून पेस आता ५१ व्या स्थानी आहे. दिविज शरणची (४४) दोन स्थानाने घसरण झाली आहे. पेसनंतर पुरव राजा (६५) व विष्णू वर्धन (१०३) यांचा क्रमांक येतो. वर्धनने सहा स्थानांनी प्रगती केली आहे.
डब्ल्यूटीए दुहेरीच्या मानांकनामध्ये सानिया मिर्झा पूर्वीप्रमाणे २४ व्या स्थानी कायम आहे.

Web Title: Federer again tops the table, Nadal's fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.