आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : चंगशी होणार ‘फेड’ची जंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:27 AM2018-01-25T00:27:05+5:302018-01-25T00:27:16+5:30

स्टार खेळाडू राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर पडले. आता संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष असेल ते रॉजर फेडररवर. स्वित्झर्लंडच्या या महान खेळाडूची पावले २०व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वळत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आता फेडररचा सामना ‘जायंट किलर’ चंग हियोनविरुद्ध होईल. निश्चितच, चंगविरुद्ध ही फेडररची जंगच असेल.

 Australian Open Tennis: The battle of 'FED' will be chunged in | आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : चंगशी होणार ‘फेड’ची जंग!

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : चंगशी होणार ‘फेड’ची जंग!

googlenewsNext

मेलबर्न : स्टार खेळाडू राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर पडले. आता संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष असेल ते रॉजर फेडररवर. स्वित्झर्लंडच्या या महान खेळाडूची पावले २०व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वळत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आता फेडररचा सामना ‘जायंट किलर’ चंग हियोनविरुद्ध होईल. निश्चितच, चंगविरुद्ध ही फेडररची जंगच असेल. महिला गटात, जर्मनी केर्बर आणि रोमानियाच्या हालेप यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
फेडररने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी टामस बर्डिच याचा ७-६ (७-१), ६-३, ६-४ ने पराभव करत १४ व्यांदा मेलबर्न पार्कच्या अंतिम चारमध्ये जागा मिळवली. दक्षिण कोरियाच्या चंग याने सेंडग्रेनचा ६-४, ७-६ (७-५), ६-३ ने पराभव केला. दोन वर्षांपूर्वी किताब जिंकणाºया कर्बर हिने अमेरिकेच्या मेडिसन कीसचा ६-१, ६-२ ने सरळ पराभव केला. आता तिचा सामना विश्वात नंबर वन असलेल्या हालेपविरुद्ध होईल.
मी खूप आनंदी आहे. मी पहिल्याच सेटमध्ये विजय मिळण्यात यशस्वी ठरलो. सामन्याच्या शेवटी हे महत्त्वपूर्ण ठरले. नवे नाव पाहून खूप चांगले वाटते. तो मला बºयाचदा नोवाक जोकाविचची आठवण करून देतो.
- रॉजर फेडरर
नदाल तीन आठवडे कोर्टबाहेर!-
1जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्पेनचा राफेल नदाल दुखापतग्रस्त आहे. त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात येईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. नदालला आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेपूर्वीसुद्धा तो फिट नव्हता. स्पर्धेत पुन्हा तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला सामना अर्ध्यावर सोडावा लागला होता.
2क्रोएशियाच्या मारिन सिलीचच्या विरोधात खेळताना पाचव्या सेटच्या वेळी त्याच्या उजव्या पायातील मांसपेशी ताणल्या गेल्या. त्याला लगेच इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्कॅनिंगही करण्यात आले. एमआरआयमध्ये त्याच्या उजव्या पायामध्ये दुखापतीचे निदान झाले आहे.
3त्यामुळे तो स्पेनला पोहोचल्यानंतर काही काळ विश्रांती घेईल. त्यानंतर फिजिओथेरपी सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. तो आगामी एकापुल्को, इंडियन वेल्स आणि मियामी येथे होणाºया स्पर्धा खेळू शकेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.
बोपन्ना-बाबोस जोडीचा विजय-
भारताची शेवटची आशा बनलेल्या रोहन बोपन्नाने हंगेरीच्या तिमिया बाबोससोबत खेळताना उपांत्य फेरीत धडक दिली आहे. या जोडीने कोलंबियाच्या जुआन सेबेश्चियन कबाल आणि अमेरिकेच्या अबिगेल स्पीयर्स या जोडीचा ६-४, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना एक तास १५ मिनिटे चालला. सामना चुरशीचा झाला; कारण विजयासाठी रोहन बोपन्नाला मेहनत घ्यावी लागली. असे असले तरी बोपन्ना-बाबोस जोडी सतर्क होती.

Web Title:  Australian Open Tennis: The battle of 'FED' will be chunged in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.